BA पास मोलकरीणीचे कारनामे, संधी मिळताच करायची 'अशी' कामे
BA पास मोलकरीणीचे कारनामे, संधी मिळताच करायची 'अशी' कामे
img
दैनिक भ्रमर
नोएडा पोलिसांनी एका धक्कादायक प्रकरणात सुशिक्षित महिलेला अटक केली आहे, जी आधी घरांमध्ये मोलकरीण म्हणून काम करायची आणि संधी मिळताच अशी काही कामे करायची कि ज्यामुळे सगळेच हैराण झाले. 

ही घटना नोएडाच्या सेक्टर ७१ मधून समोर आली आहे. बिहारमधील मधुबनी येथील रहिवासी असलेली आरोपी महिला जूली हिला पोलिसांनी अटक केली आहे. तिने नुकतेच प्रतिभा सिंह नावाच्या महिलेच्या घरी मोलकरीण म्हणून काम सुरू केले होते. प्रतिभा त्यांच्या पतीच्या व्यवसायामुळे बहुतेक वेळ परदेशात जात असत. त्यांच्या घरात आधीपासून सुनीता नावाची एक महिला मोलकरीण म्हणून काम करत होती. ही महिला संधी मिळताच घरातील दागिने हात साफ करून पसार व्हायची. मात्र, यावेळी एका घरातून चोरी करून पळून गेल्यानंतर पोलिसांनी तिला दागिने विकताना रंगेहाथ पकडले. चौकशीदरम्यान, आरोपी महिलेने आपण बीए पास असल्याचे कबूल केले आहे. ती घरांमध्ये मोलकरीण म्हणून जायची आणि संधी मिळताच चोरी करून पळून जायची, असे तिने सांगितले.

सोन्याची चेन आणि कानातले घेऊन पसार
काही दिवसांपूर्वीच प्रतिभा यांच्या मुलीची डिलिव्हरी झाली होती, त्यासाठी त्यांनी जूलीला कामावर ठेवले होते. मात्र, जूलीने तीन दिवसांपूर्वी, म्हणजेच ६ जुलै रोजी, घरातून एक सोन्याची चेन आणि सोन्याचे कुंडल चोरले. याबाबत मालकीण प्रतिभा सिंह यांनी जूलीला विचारले असता, तिने टाळाटाळ केली आणि त्यानंतर आपला मोबाईलही बंद केला. तेव्हापासून जूली कामावरही आली नाही.

दागिने विकताना पोलिसांच्या जाळ्यात
प्रतिभा सिंह यांनी सुनीताला या प्रकरणाबद्दल सांगितले. सुनीताने जूलीविरुद्ध पोलिसांत तक्रार दाखल केली. पोलिसांनी या प्रकरणी आरोपी महिलेचा शोध सुरू केला. पोलिसांनी शोध सुरू केला असता, ती महिला सेक्टर ७१मध्ये चोरीचे दागिने विकत होती. त्याचवेळी पोलिसांनी तिला अटक केली. महिलेने चौकशीत आपला गुन्हा कबूल करत संपूर्ण प्रकरणाचा खुलासा केला आणि आपण बीए पास असल्याचे देखील सांगितले. आता पोलिसांनी तिला ताब्यात घेतले असून, पुढील कारवाई करण्यात येणार आहे.

इतर बातम्या
Join Whatsapp Group