
१ फेब्रुवारी २०२५
मुंबईकरांसाठी महत्वाची बातमी आहे. मुंबईकरांचा प्रवास आजपासून महागला आहे. कारण मुंबईतील ऑटो रिक्षा-टॅक्सीच्या दरामध्ये वाढ झाली आहे. ऑटो रिक्षा आणि टॅक्सीच्या दरामध्ये ३ रुपयांनी वाढ झाली आहे. तर कूल कॅबच्या दरामध्ये ८ रुपयांनी वाढ झाली आहे.
त्यामुळे मुंबईकरांना आजपासून प्रवासासाठी जास्तीचे पैसे मोजावे लागणार आहे. ऑटो रिक्षा आणि टॅक्सीच्या दरामध्ये ३ रुपयांनी वाढ झाल्यामुळे मुंबईकरांना आजपासून ऑटो रिक्षाने प्रवास करताना २३ रुपयांऐवजी २६ रुपये द्यावे लागणार आहे.
टॅक्सीसाठी आधी २८ रुपये भाडे द्यावे लागत होते पण आजपासून ३१ रुपये भाडे द्यावे लागणार आहे. कूल कॅबचे आधीचे भाडे ४० रुपये होते तर आजपासून ४८ रुपये भाडे द्यावे लागणार आहे.
त्यामुळे मुंबईकरांच्या खिशाला आता अतिरिक्त भर्दुंड सहन करावा लागणार आहे. या नव्या दरवाढीनुसार मीटरमध्ये फेरबदल करण्याची मुदत एप्रिल महिन्याच्या शेवटपर्यंत असेल. तोपर्यंत सुधारित भाडे आकारणीचा चार्ट देण्यात आला आहे.
Copyright ©2025 Bhramar