मुंबईत सेक्स रॅकेटचा पर्दाफाश; ४ अभिनेत्रींची सुटका
मुंबईत सेक्स रॅकेटचा पर्दाफाश; ४ अभिनेत्रींची सुटका
img
दैनिक भ्रमर
काही दिवसांपूर्वीच ठाणे शहरात सुरू असलेल्या वेश्याव्यवसाय रॅकेटचा पर्दाफाश करताना पोलिसांनी एका एजंटला अटक केली होती. मुंबई पोलिसांनी शुक्रवारी एका सेक्स रॅकेटचा पर्दाफाश केला. मिळालेल्या माहितीनुसार, मुंबई पोलिसांनी पवई परिसरात ही कारवाई केली आहे. 

या प्रकरणी एका व्यक्तीला अटक करण्यात आली असून हॉटेलमधून चार अभिनेत्रींचीही सुटका करण्यात आली, ज्यात हिंदी टीव्ही मालिकांमध्ये काम केलेल्या एका अभिनेत्रीचा समावेश आहे. अटक केलेल्या दलाल श्याम सुंदर अरोरा याने या सर्वांना वेश्याव्यवसायात ढकलल्याचा आरोप आहे. पोलिसांनी हॉटेलमध्ये सापळा रचून दलालाच्या मुसक्या आवळल्या. या प्रकरणाची माहिती देताना एका अधिकाऱ्याने सांगितले की, विशिष्ट माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी हॉटेलमध्ये सापळा रचला आणि महिलांना वेश्याव्यवसायात ढकलल्याबद्दल श्याम सुंदर अरोरा नावाच्या एका पुरूषाला अटक केली.

आरोपी व्यक्ती आणि त्याच्या साथीदाराविरुद्ध पवई पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाची चौकशी सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे. 

इतर बातम्या
Join Whatsapp Group