काँग्रेसकडून लोकसभा निवडणुकीसाठी जाहीरनामा जाहीर ; केल्या 'या' मोठ्या घोषणा
Dipali Ghadwaje
देशात लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली आहे. अनेक पक्षांनी आपल्या उमेदवारांची यादी जाहिर केली आहे. सध्या प्रचाराला सुरुवात झाली असून निवडून आल्यावर अनेक कामे करण्याची प्रलोभने मतदार राजाला दाखवली जात आहे. अशातच काँग्रेसने जाहीरनामा प्रसिद्ध केला आहे.
या जाहिरनाम्यात ५ न्याय आणि २५ गँरंटीचा समावेश आहे. यावेळी काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे, सोनिया गांधी, राहुल गांधी आणि इतर नेते उपस्थित होते.
आज काँग्रेसने पत्रकार परिषद घेत लोकसभा निवडणुकीचा जाहीरनामा प्रसिद्ध केला आहे. तब्बल ४८ पानी असलेल्या या जाहीरनाम्यात शेतकऱ्यांच्या मालाला हमी भाव ते ३० लाख सरकारी नोकऱ्या, आरोग्य, राष्ट्रीय सुरक्षा, संरक्षण, हवामान, न्याय संरक्षण यावर भर देण्यात आला आहे.
दिल्लीत झालेल्या पत्रकार परिषदेत सोनिया गांधी, काँग्रेस नेते राहुल गांधी, प्रियांका गांधी, काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जून खर्गे तसेच आदी नेते उपस्थित होते. काँग्रेसने प्रसिद्ध केलेल्या जाहीरनाम्याला न्याय पत्र म्हटले आहे. हा जाहीरनामा ‘ग्यान’ या संकल्पनेवर आधारीत ठेवण्यात आला आहे. या जाहीरनाम्या बद्दल बोलतांना राहुल गांधी म्हणाले, जी म्हणजे गरीब, वाय म्हणजे यूथ, ए म्हणजे अन्नदाता तर एन म्हणजे नारी. या घटकांना केंद्रस्थानी ठेवून आम्ही आमचा जाहीरनामा तयार केला आहे. सत्ता येत्याक प्रामुख्याने याची अमलबजावणी करण्यात येईल असे देखील राहुल गांधी म्हणाले.
काँग्रेसने प्रसिद्ध केलेला या जाहिरनाम्याचे १० भाग करण्यात आले आहे. यात रोजगार, शेतकऱ्यांचे प्रश्न, आरोग्य, राष्ट्रीय सुरक्षा, संरक्षण, आरोग्य, घटनादुरुस्ती आणि संविधानाचे संरक्षण या सारख्या मुद्यांना प्राधान्य देण्यात आले आहे.
या सोबतच देशभर जातीवर आधारित जनगणना करण्याचे आश्वासन काँग्रेसने दिले आहे. काँग्रेसने म्हटले आहे की त्यांचा जाहीरनामा पाच न्यायांवर आधारित आहे (भागधारक न्याय, शेतकरी न्याय, महिला न्याय, कामगार न्याय आणि युवा न्याय). युथ जस्टिस अंतर्गत काँग्रेसने ज्या पाच हमींची चर्चा केली त्यात ३० लाख सरकारी नोकऱ्या आणि तरुणांना वर्षभरासाठी १ लाख रुपये देण्याच्या आश्वासनांचा समावेश आहे.