भाजपला मोठा धक्का ; दोन बडे नेते शरद पवारांच्या संपर्कात असल्याची माहिती समोर....
भाजपला मोठा धक्का ; दोन बडे नेते शरद पवारांच्या संपर्कात असल्याची माहिती समोर....
img
Dipali Ghadwaje
नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात महायुतीला मोठं अपयश पाहावं लागलं. तर महाविकास आघाडीने राज्यात महायुतीला मोठा दणका दिला. या यशानंतर अनेक नेते शरद पवार गटाच्या संपर्कात असून लवकरच पक्षप्रवेश करतील असे दावे शरद पवार गटातील आमदार आणि नेते करत आहेत, अशातच एक महत्वाची बातमी समोर आली आहे. विधानसभा निवडणुकीआधी भाजपला मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे. 

भाजपचे दोन बडे नेते शरद पवारांच्या संपर्कात असल्याची माहिती आहे. पश्चिम महाराष्ट्रातील दोन बडे नेते शरद पवार गटाच्या संपर्कात असल्याची माहिती आहे. कोल्हापूरचे भाजपचे नेते समरजित घाटगे हे शरद पवार गटाच्या संपर्कात आहेत. समरजीत घाटगे यांचा शरद पवार गटात प्रवेश जवळपास निश्चित मानला जात आहे. तर पुणे जिल्ह्यातील इंदापूरचे भाजप नेते, माजी मंत्री हर्षवर्धन पाटील हे देखील शरद पवार गटाच्या संपर्कात असल्याची माहिती समोर आली आहे. 

हेही वाचा >>>> महाराष्ट्र पुन्हा हादरला...! आधी अपहरण अन् मग ... , नाशिकच्या सिन्नर तालुक्यात4 वर्षांच्या चिमुकलीसोबत घडलं भयंकर कृत्य

अजित पवार कोल्हापुरात असताना त्यांनी मंत्री हसन मुश्रीफ यांची कागलमधून उमेदवारी जाहीर केली. समरजित घाटगे इथून लढण्यास इच्छुक होते. मात्र महायुतीत ही जागा राष्ट्रवादी अजित पवार गटाकडे जाण्याची दाट शक्यता आहे. त्यामुळे समरजित घाटगे यांनी राष्ट्रवादी शरद पवार गटाचा पर्याय निवडल्याचं समजतंय. 

तर इंदापूरमध्येही विधानसभेला राष्ट्रवादी अजित पवार गटाकडून दत्तात्रय भरणे यांना उमेदवारी दिली जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे हर्षवर्धन पाटील हे शरद पवार गटात प्रवेश करून निवडणूक लढवतील, अशी राजकीय वर्तुळात चर्चा आहे.

इतर बातम्या
Join Whatsapp Group