बुलढाण्यात टक्कल पडलेल्यांना केस उगवायला सुरूवात पण आली एक नवीनच समस्या
बुलढाण्यात टक्कल पडलेल्यांना केस उगवायला सुरूवात पण आली एक नवीनच समस्या
img
दैनिक भ्रमर
बुलढाणा येथील शेगांव गावातील अनेक लोकांना अचानक केसगळती सुरु झाल्याने देशभर टक्कल व्हायरसची चर्चा सुरु झाली होती. या अचानक सुरु झालेल्या केसगळती मागचे कारण अद्याप कोणालाही समजले नाही. या गावातील लोकांना पुरविण्यात येणाऱ्या पाण्याचे नमूने तपासण्यात आले. आयसीएमआरच्या पथकाने गावात येऊन तपासणी केली आहे. आयसीएमआरचा अहवाल काही आलेला नाही. परंतू या गावातील लोकांच्या डोक्यावर आता एका औषधाने केस उगवले आहेत. परंतू आता त्यांना नवीन समस्या सुरु झाली आहे.

दरम्यान , बुलढाणा येथील बोंडगाव, कालवड, हिंगणा अशा ११ गावात अक्षरश:  ‘टक्कल व्हायरस’ पसरला आहे असा दावा केला जात आहे. लोकांना आधी डोक्यात खाज येते, त्यानंतर खाजवण्यास गेले असता थेट केसच हातात येतात. त्यामुळे गावातील तरुणांच्या लग्नाचे देखील वांदे झाले आहेत. या गावातील तरुणांना कोणी मुलगी तयार होत नसल्याचे देखील उघडकीस आले आहे.
इतर बातम्या
Join Whatsapp Group