दिवसेंदिवस गुन्हेगारीच्या प्रमाणात चिंताजनक वाढ झाली असून मारामारी, दादागिरी,तसेच अनेक गंभीर स्वरूपाचे गुन्हे देखील सर्रास पणे घडत असतात. दरम्यान, अशाच प्रकारचा एक धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. पुणेमधील हिंजवडी ही घटना घडली आहे.
एका २० वर्षाच्या तरुणाला रुमवर बोलावून घेऊन तु आमची बरोबरी करतो, असे म्हणून त्याला मारहाण केली. अंगावरील सर्व कपडे काढायला लावून त्याचा नग्न व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी हिंजवडी पोलिसांनी तिघांना अटक केली आहे. ही घटना मारुंजी रोडवरील पणाचे सोसायटीतील आरोपींच्या फ्लॅटवर २१ जानेवारी रोजी रात्री साडेबारा वाजता घडली होती.
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांचा मित्राने फिर्यादीला पणाचे सोसायटी येथील फ्लॅटवर बोलावून घेतले. राम गंभीरे याने फिर्यादीला सिगारेट दिली होती. ती त्याच्या हातातून खाली पडली, म्हणून फिर्यादीने ती उचलून उभी केली. त्यावर राम याने तू माझी बरोबरी करतो का?, असे बोलून चिडून फिर्यादी यांना हाताने लाथाबुक्क्यांनी पाठीत, पोटात तसेच हातातील लोखंडी कड्याने त्यांच्या छातीत, बरगडीवर, मांडीवर मारहाण केली. जबरदस्तीने अंगातील कपडे काढायला लावले. त्याच्या प्रायव्हेट पार्टला आयोडेक्स बाम लावण्यास लावला. त्यानंतर ललीत भदाने याने फिर्यादी यांचा नग्नावस्थेतील व्हिडिओ काढून फ्रेड सर्कल व्हॉटसअॅप ग्रुपवर व्हायरल केला. यावेळी राम याने फिर्यादी यांना ‘‘जा तुला कोणाकडे जायचे तिकडे जा़ अशा माझ्यावर ५३ केसेस आहेत. माझे कोणीही बिघडु शकत नाही़’’ अशी धमकी दिली. पोलिसांनी तिघांना अटक केली आहे. वरिष्ठ पोलीस निरीक्षक कन्हैया थोरात अधिक तपास करीत आहेत.
श्रेयस संजय कवडे (वय १९, रा. पणाचे सोसायटी, हिंजवडी, मुळ रा. ढोकी ता. जि. धाराशिव), ललित प्रमोद भदाने (वय २१, रा. पणाचे सोसायटी, हिंजवडी, मुळ रा. वारुड, ता. शिंदखेडा, जि. धुळे) आणि राम तुळशीराम गंभिरे (वय ३५, रा. हडपसर, मुळ रा. सिंकदरपूर, ता. जि. लातूर) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. याप्रकरणी एका २० वर्षाच्या तरुणाने हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.