सहा दिवसांच्या मुलीला  विकलं ! नातीसाठी आजीने मुलाला आणि सुनेला तुरुंगात टाकलं
सहा दिवसांच्या मुलीला विकलं ! नातीसाठी आजीने मुलाला आणि सुनेला तुरुंगात टाकलं
img
दैनिक भ्रमर
आजी आणि नातवंड म्हंटले की त्यांचं प्रेम हे जगावेगळं आणि अतोनात असत. हे प्रेम असं असत की  ते एकमेकांसाठी काहीही करायला तयार असतात. अशीच एक घटना समोर आली आहे. उल्हासनगरमध्ये सहा दिवसांच्या मुलीला तिच्या आई-वडिलांनी 90 हजार रुपयांना विकलं, पण मुलीच्या आजीने या मुलीची सुटका केली आहे. आजीने स्वत:चाच मुलगा आणि सुनेविरोधात पोलिसात तक्रार दाखल केली, यानंतर पोलिसांनी आरोपींविरोधात गुन्हा दाखल करून मुलीची सुटका केली आहे.

उल्हासनगरमधील  गायकवाड कुटुंबात 22 जानेवारीला एका मुलीचा जन्म झाला, पण फक्त 6 दिवसांमध्येच मुलीच्या आई-वडिलांनी मुलीला 90 हजारांना विकलं. मुलीची आजी मुलीला बघायला रुग्णालयात गेली, तेव्हा सुनेजवळ नात नसल्याचं आजीच्या लक्षात आलं. यानंतर आजीने मुलगा विशालकडे नातीबद्दल विचारलं, तेव्हा आपण मुलीला विकल्याचं त्याने सांगितलं.

मुलाने दिलेलं उत्तर ऐकून आजीच्या पायाखालची जमीनच सरकली. पैसे परत देऊन मुलीला परत आण, असं आजीने विशालला सांगितलं, पण त्याने यावर कोणतीही प्रतिक्रिया दिली नाही. मुलीला नेमकं कुणाला विकलं? हे माहिती नसल्यामुळे आजीने उल्हासनगरच्या मध्यवर्ती पोलीस स्टेशनमध्ये जाऊन तक्रार दाखल केली.


मिळालेल्या माहितीनुसार , आजीच्या तक्रारीनंतर पोलिसांनी मुलीचे आई-वडील, मध्यस्थ, महिला आणि मुलगी विकत घेणाऱ्या शेख परिवाराविरोधात गुन्हा दाखल केला आहे. गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलिसांनी सर्व आरोपींना अटक केली आहे. मुलीची विक्री का केली गेली? शेख कुटुंबाने याआधी नवजात मुलांची खरेदी केली आहे का? याचा तपास उल्हासनगर पोलीस घेत आहेत.
इतर बातम्या
Join Whatsapp Group