नाशिक - येथे होणाऱ्या सिंहस्थ कुंभमेळ्याच्या वैष्णवी आखाड्याच्या प्रवक्तेपदी पंचमुखी हनुमान मंदिराचे प्रमुख डॉ. भक्तीचरणदास महाराज यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
नाशिक मध्ये होऊ घातलेल्या सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी तीनही आखाड्यांच्या प्रमुखांची बैठक आज प्रयाग येथे झाली. या बैठकीमध्ये नाशिकमध्ये होऊ घातलेल्या सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी तीनही वैष्णवी आखाड्यांचे प्रवक्ते म्हणून पंचमुखी हनुमान मंदिराचे प्रमुख श्रीराम गोदावरी व कपिला नदीसंगम आरती समितीचे महंत डॉ. भक्तीचरणदास महाराज यांची नियुक्ती करण्याचा निर्णय घोषित करण्यात आला आहे.
तीनही आखाड्यांच्या तसेच सिंहस्थ कुंभमेळ्याच्या संदर्भामध्ये आखाड्यांची भूमिका आता फक्त भक्तीचरणदास महाराज हे स्पष्ट करतील. भक्ती चरणदास महाराज यांची नियुक्ती झाल्यानंतर विविध क्षेत्रातील मान्यवरांसह तिन्ही आखाड्यांमधून त्यांच्या अभिनंदन केले जात आहे.