आज ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये ठाणे जिल्हा नियोजन समितीची बैठक आयोजित करण्यात आले होते. या बैठकीला पालकमंत्री म्हणून एकनाथ शिंदे बैठकीला उपस्थित होते.यादरम्यान एकनाथ शिंदे कमालीचे संतापले असल्याची माहिती समोर आली.त्यांनी बैठकीला नसणाऱ्या अधिकाऱ्यांच्या कारवाईचे आदेशच देऊन टाकले.
या बैठकीला पालकमंत्री म्हणून एकनाथ शिंदे बैठकीला उपस्थित होते. तर रवींद्र चव्हाण, संजय केळकर, निरंजन डावखरे, किसान कथोरे, कुमार ऐलानी, सुलभा गायकवाड राजेश मोरे हे आमदार उपस्थित होते. पण या बैठकीला Midc चे अधिकारी बैठकीत उपस्थित नसल्याचं समोर आलं. त्यामुळे पालकमंत्री एकनाथ शिंदे कमालीचे संतापले. अधिकारी का उपस्थित नाहीत. आमदार, खासदारांच्या प्रश्नांना उत्तर देणार कोण? असा सवाल एकनाथ शिंदेंनी केला. जे अधिकारी उपस्थित नाही त्यांच्यावर कारवाई करण्याचे एकनाथ शिंदे यांनी आदेश दिले.