धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याची मागणी होत असताना तृप्ती देसाई यांनी केलं ''हे''  मोठं विधान
धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याची मागणी होत असताना तृप्ती देसाई यांनी केलं ''हे'' मोठं विधान
img
दैनिक भ्रमर
बीड जिल्ह्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्याप्रकरणाने संपूर्ण महाराष्ट्र हादरला असून   धनंजय मुंडे यांच्या कार्यकर्त्यांवर संशय व्यक्त केलं जात आहे. दरम्यान, या प्रकरणाचा सर्वच स्थरातून निषेध केला जात असून  या सर्व प्रकरणात धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी होत आहे.

 अंजली दमानिया यांच्यासोबत झालेल्या बैठकीची माहिती काल अजितदादांनी राष्ट्रवादीच्या आमदारांना, बैठकी दरम्यान दिली. दमानिया यांनी दिलेली सर्व कागदपत्रे ही मुख्यमंत्र्यांना दिल्याची माहिती दादांनी दिल्याची माहिती समोर येत आहे. तर काही जण माझ्यावर वैयक्तिक रागातून आरोप करत आहेत, असा आरोप धनंजय मुंडे यांनी केला आहे.

दरम्यान , धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याविषयी उलटसुलट चर्चा होत असतानाच आता तृप्ती देसाई यांनी मोठा गौप्यस्फोट केला आहे. धनंजय मुंडे हे दिल्लीत अमित शहांना भेटतील आणि भेटून आल्यानंतर त्यांचा राजीनामा होईल, असा दावा देसाई यांनी केला. त्यांच्या या दाव्यामुळे एकच खळबळ उडाली आहे.

अमित शहा जास्त काळ महायुतीची बदनामी सहन करणार नाहीत. आता पर्यंत मुंडे यांचा राजीनामा व्हायला पाहिजे होता. ते जो पर्यंत राजीनामा देत नाहीत तो पर्यंत बीड बदनाम होत राहील. कारण बीडची बदनामी ही त्यांच्या टोळीमुळे झाली आहे, असे देसाई म्हणाल्या. यावेळी त्यांनी गुणरत्न सदावर्तेंवर तोंडसुख घेतले. गुणरत्न सदावर्ते जे बोलले ते बरोबर आहे. मिकी म्हणजे वाल्मिक कराड आणि धनंजय मुंडे माऊस फक्त त्यांनी पात्र बदलले आहेत, असा टोला त्यांनी लगावला.

इतर बातम्या
Join Whatsapp Group