ड्रामा क्वीन राखी सावंत अनेकदा चर्चेचा विषय ठरते. विशेषतः तिचा ड्रामा आणि तिचा कॉन्ट्रोवर्सी यामुळे ती चर्चेचा विषय बनते. तसेच नेहमीच राखी सावंतच्या वैयक्तिक आयुष्याची चर्चा होतच असते. तिच्या अफेअर्सबद्दल, तिच्या लग्नाबद्दल नेहमीच काहीना काही घडत असतं. आताही राखी सावंत अशाच एका बातमीमुळे पुन्हा चर्चेचा विषय ठरतेय. ती बातमी म्हणजे राखी सावंत पाकिस्तानच्या एका व्यक्तीशी लग्न करणार असल्याची. याबद्दल स्वत: राखीने खुलासा केला आहे.
पाकिस्तानी अभिनेता डोडी खाननेही राखी सावंतला लग्नाची मागणी घातल्याचं तिने सांगितलं आहे. मात्र दोन घटस्फोटानंतर आता राखी तिसरं लग्न करणार आहे. राखी आता या मुद्द्यावर स्पष्टपणेच बोलली आहे. राखी सावंतने एका मुलाखतीत तिच्या तिसऱ्या लग्नाच्या बातमीवर चर्चा केली. राखी सावंतने सांगितले की, ती सध्या पाकिस्तानच्या लाहोरमध्ये आहे. ती म्हणाली की ती डोडी खानच्या लग्नाच्या प्रस्तावावर विचार करेल आणि पाकिस्तानची सून होण्याचा विचार करेल.
राखी सावंत म्हणाली, “हो, हे अगदी बरोबर आहे. मी पाकिस्तान लाहोरला आले आहे. जेव्हा पाकिस्तानातील लोकांनी पाहिले की मी तिथे पोहोचले आहे, तेव्हा डोडी जी माझे खूप दिवसांपासूनचे मित्र आहेत, म्हणून त्यांनी मला लग्नाचा प्रस्ताव दिला, मला त्यांचा प्रस्ताव खूप आवडला. सध्या मी लग्नाचा विचार करत आहे, मी पाकिस्तानची सून होण्याचा विचार करत आहे.” असं राखीने स्पष्टच सांगितले आहे.
डोडी खान पाकिस्तानी अभिनेता आणि मॉडेल आहेत. तर रिपोर्टनुसार ते पाकिस्तानात पोलीस अधिकारी देखील आहेत. तसेच त्यांची पाकिस्तानात प्रचंड लोकप्रियता आहे, डोडी यांनी पाकिस्तानात दुर्ज, घबराना नहीं है, आखाडा आणि चौधरी सारख्या अनेक चित्रपटांमध्ये त्यांनी काम केलं आहे. ते बॉलिवूड स्टार संजय दत्तला आपला आदर्श मानतात. त्यामुळे आता राखीच्या तिसऱ्या लग्नाची चर्चा ही खरी आहे की फक्त एक कॉन्ट्रोवर्सी हे लवकरच समजेल.