सातपूर (मंगेश एरंडे) :- परिसरातील अशोकनगर येथे रिक्षाचे टपरी मध्ये रूपांतर करून चहा विक्रीचा व्यवसाय करणाऱ्या रिक्षा मध्ये सिलेंडरच्या स्फोट झाला. या स्फ़ोटात सुमारे दोन लाखाचे नुकसान झाले आहे. सुदैवाने जिवितहानी झाली नाही.
याबाबत अधिक माहिती अशी की, अशोक नगर शेवटच्या बस थांबा जवळ एक रिक्षा चहाची टपरी आहे. त्या चहा टपरीमध्ये घरगुती सिलेंडरचा वापर चहा बनविण्यसाठी करण्यात येत होता. चहा टपरी मालक २८ जानेवारी रोजी रात्री टपरी बंद करून गेल्यावर, मध्यरात्रीच्या सुमारास चार वाजेच्या सुमारास टपरी मध्ये असलेल्या गॅस सिलेंडरचा स्फोट झाला. सिलेंडरचा स्फोट इतका भयंकर होता की, ते सिलेंडर उडून २५० मीटर लांब जाऊन पडले.
या स्फोटामुळे शेजारी असलेल्या चायनिज व पाव वड्यांच्या दुकानाचेही नुकसान झाले. अडीचशे मीटर लांब असलेल्या मेट्रो सिरॅमिक या दुकानाचे चाळीस ते पन्नास हजार रुपयांचे नुकसान झाले. तसेच जवळच उभ्या असलेल्या इनोव्हा क्रेस्टा या गाडीचे चाळीस हजाराचे नुकसान झाले आहे.