धक्कादायक !  पाईपलाईनजवळ आढळला कॅब ड्रायव्हरचा मृतदेह,  20 वर्षीय महिलेला अटक
धक्कादायक ! पाईपलाईनजवळ आढळला कॅब ड्रायव्हरचा मृतदेह, 20 वर्षीय महिलेला अटक
img
दैनिक भ्रमर
देशभरात गुन्हेगारीच्या प्रमाणात चिंताजनक वाढ होत असून हत्ये सारखे गॅम्बभीर गुणे देखील सर्रास पाने घडत आहेत. अशीच एक धकाकड्याक घटना पाहणे येथे उघडकीस आली आहे. अक्रम नामक  कॅब चालकाचा मृतदेश वैतरणा पाईपलाईनजवळ आढळला असून अक्रमच्या डोक्यात जाड वस्तूने वार करण्यात आल्याचं पोलिसांनी सांगितलं आहे. दरम्यान ठाणे पोलिसांनी या प्रकरणी  20 वर्षांच्या महिलेला अटक केली आहे. 

मिळालेल्या माहितीनुसार,  मृत्यू झालेला 22 वर्षांचा अक्रम इकबाल कुरेशी मुंबईच्या जोगेश्वरी भागात राहत होता. 17 जानेवारीला अक्रम घरातून कॅब घेऊन निघाला, पण त्यानंतर तो गायब झाला. दुसऱ्या दिवशी अक्रमचा मृतदेह तानसा-वैतरणा पाईपलाईनजवळ आढळला होता. अक्रम कुरेशी घरी न आल्यामुळे त्याच्या भावाने मुंबईच्या ओशिवारा पोलीस स्टेशनमध्ये गायब झाल्याची तक्रार दिली होती. तपासामध्ये पोलिसांना काही महत्त्वाचे धागेदोरे सापडले, ज्या आधारावर पोलिसांनी 20 वर्षांच्या महिलेला अटक केली आहे.

अक्रम कुरेशी याची हत्या नेमकी कशामुळे झाली? या हत्येचा उद्देश दरोडा की जुने वाद? याचा तपास पोलीस करत आहेत. या हत्येमागे एकटी महिला आहे का आणखी कुणी? याचाही तपास पोलीस करत आहेत. अन्य संशयितांचा शोधही पोलीस घेत आहेत, पण या हत्येमुळे परिसरात खळबळ माजली आहे.
इतर बातम्या
Join Whatsapp Group