गुरु-शिष्याच्या नात्याला काळीमा फासणारी घटना ! अल्पवयीन विद्यार्थिनीचा विनयभंग करणाऱ्या शिक्षकाविरुद्ध ‘पोस्को’ अंतर्गत गुन्हा दाखल
गुरु-शिष्याच्या नात्याला काळीमा फासणारी घटना ! अल्पवयीन विद्यार्थिनीचा विनयभंग करणाऱ्या शिक्षकाविरुद्ध ‘पोस्को’ अंतर्गत गुन्हा दाखल
img
Dipali Ghadwaje
गुरु-शिष्याच्या पवित्र नात्याला कलंक लावणारी घटना समोर आली आहे.  सोलापुरातील एका नामांकित शाळेत हा धक्कादायक प्रकार घडला आहे. अल्पवयीन विद्यार्थिनीचा विनयभंग करणाऱ्या शिक्षकाविरुद्ध ‘पोस्को’ अंतर्गत गुन्हा दाखल झाला आहे. पीडित विद्यार्थिनीने दिलेल्या फिर्यादवरून सोलापुरातील एका नामांकित शाळेतील शिक्षकाविरूद्ध पोलिसांत गुन्हा दाखल झाला आहे.

याबाबत मिळालेल्या माहितीनुसार ,  यल्लपा उर्फ सुमित गाडेकर असे आरोपी शिक्षकाचे नाव आहे. ‘मला सोडून जाऊ नकोस, अन्यथा मी काहीतरी बरेवाईट करून घेईन’, अशी धमकी देऊन मानसिक त्रास दिल्याचं विद्यार्थिनीने फिर्यादमध्ये म्हटलं आहे. शिक्षकाने जुलै 2023 मध्ये एका अल्पवयीन विद्यार्थिनीशी संवाद साधून प्रपोज केलं. विद्यार्थिनीने नकार दिल्यानंतरही हा शिक्षक सतत पाठलाग करत होता.

जानेवारी 2024 मध्ये हात धरून जबरदस्तीने घेऊन जाऊन तिच्याशी जवळीकता साधण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप या शिक्षकावर आहे. पीडित मुलीच्या फिर्यादीवरून पॉस्को कलम 12 सह भारतीय न्याय संहिता कलम 74, 78, 351 (2) अन्वये गुन्हा नोंद झाला आहे.

 
इतर बातम्या
Join Whatsapp Group