बहिणीच्या मुलाला दारू पाजली म्हणून पत्नीने पतीला दांड्याने बदडले
बहिणीच्या मुलाला दारू पाजली म्हणून पत्नीने पतीला दांड्याने बदडले
img
दैनिक भ्रमर

नाशिक (भ्रमर प्रतिनिधी) :- बहिणीच्या मुलाला दारू का पाजली, असे म्हणून कुरापत काढून पत्नीने मुलाच्या मदतीने पतीला लाकडी दांड्याने मारहाण केल्याची घटना पाथर्डी गावात घडली.

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, की फिर्यादी सुकदेव लखा शिंपी (रा. पाथर्डी गाव) हे मजुरी काम करतात. शिंपी हे काल (दि. 22) सकाळी साडेनऊ वाजेच्या सुमारास घरी होते. त्यावेळी “माझ्या बहिणीचा मुलगा वाल्मीक ठाकरे याला दारू का पाजली,” असे म्हणत त्यांची पत्नी अलका सुकदेव शिंपी हिने कुरापत काढून पतीला शिवीगाळ केली, तर फिर्यादीचा मुलगा मंगेश शिंपी (वय 26) याने लाकडी दांड्याने मारहाण करून त्यांचा हात फ्रॅक्चर केला.

या प्रकरणी इंदिरानगर पोलीस ठाण्यात मायलेकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक गांगुर्डे करीत आहेत.
इतर बातम्या
Join Whatsapp Group