Nashik : लग्नाचे आमिष दाखवून तरुणीवर वेळोवेळी लैंगिक अत्याचार
Nashik : लग्नाचे आमिष दाखवून तरुणीवर वेळोवेळी लैंगिक अत्याचार
img
Prashant Nirantar

नवीन नाशिक (भ्रमर प्रतिनिधी) :- तरुणीशी मैत्री करुन तिच्याशी प्रेम संबंध प्रस्थापित करुन लग्नाचे आमिष दाखवून तिच्यावर लैंगिक अत्याचार करणार्‍या तरुणाविरुद्ध बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, फिर्यादी पिडीत तरुणी ही 24 वर्षीय असून, ती मुळची सटाणा येथील असून, सध्या त्रिमूर्ती चौक परिसरात भाऊ व वहिणीसह राहते. ही तरुणी गेल्या एक वर्षापासून संभाजी चौकातील एका शोरूममध्ये काम करते.

तेथे असलेल्या तिची मैत्रीण अंजली हिच्यामार्फत संशयित साकीब तोहिद शेख (रा. गोसावीवाडी, नशिकरोड) याच्यासोबत मार्च 2023 मध्ये ओळख झाली. त्यानंतर पिडीता व साकिब शेख एकमेकांशी फोनवर बोलू लागले. त्यांच्यात मैत्रीचे संबंध तयार होऊन ते एकमेकांच्या प्रेमात पडले. त्यानंतर त्यांच्या भेटीगाठी सुरु झाल्या. त्यादरम्यान शेख हा एकेदिवशी पिडीतेच्या घरी आला.

माझे तुझ्यावर खूप प्रेम आहे, मला तुझ्यासोबत लग्न करायचे आहे, असे सांगून पिडीतेचा विश्‍वास संपादन केला. त्यानंतर आरोपीने पिडीता एकटी असल्यचा संधी साधून वेळोवेळी तिच्या घरी येऊन तिच्या ईच्छेविरुद्ध जबरदस्तीने अत्याचार केले. त्यानंतर पिडीतेने लग्न करणार असल्याची माहिती तिच्या आई-वडिलांना सांगितली. त्यानंतर आरोपी शाकिब हा पिडीतेच्या मुळ गावी सटाणा येथे गेला. व तिच्या आई-वडिलांना भेटून पिडीतेशी लग्नाबाबतची मागणी केली. पिडीतेच्या आई-वडिलांनीही या लग्नाला होकार दिला.

त्यानंतर साकिब हा वेळोवेळी भेटून तिच्या ईच्छेविरुद्ध अत्याचार करु लागला. काही दिवसांनी पिडीतेचे आई-वडिल हे साकिबच्या घरी जाऊन त्याच्या आई-वडिलांना भेटले. व लग्नाबाबत विचारले असता त्यांनी लग्नास नकार दिला. त्यानंतर आरोपी साकिब हा पिडीतेच्या घरी जाऊन भेटला व माझ्या घरच्यांचा जरी विरोध असला तरी मी तुझ्याशीच लग्न करेल, अशी हमी साकिबने दिली. त्यामुळे पिडीतेच्या आई-वडिलांनी ऑगस्ट 2023 मध्ये पिडीता व साकिब यांचा साखरपुडा करुन दिला आणि 3 डिसेंबर रोजी आपण लग्न करू असे सांगून, साकिब हा त्याच्या मुळ गावी उत्तर प्रदेश येथे निघून गेला.

3 डिसेंबर 2023 चा दिवस उजाडला तरी साकिब हा लग्न करण्यासाठी आला नाही, म्हणून त्याच्याशी फोनवर संपर्क साधून लग्नाबाबत विचारणा केली असता त्याने उडवाउडवीची उत्तरे देऊन आपण ज्यावेळी स्वत:च्या पायावर उभे राहू, तेव्हा आपण लग्न करु, असे सांगितले. त्याच्या बोलण्यावर विश्‍वास ठेऊन पिडीतेने पुन्हा कामाला सुरुवात केली. मार्च 2024 मध्ये साकिब हा नाशिकमध्ये आला आणि पिडीतेला पुन्हा भेटला लग्नासाठी विनंती करू लागला. त्यानंतर त्याने पिडीतेच्या आई-वडिलांना भेटून 15 दिवसांत लग्न करण्याचे ठरवले. त्यानंतर पुन्हा स्वत:च्या पायावर उभे राहू, व्यवस्थित सेटल होऊ मग लग्न करू असे सांगून, बरेच दिवस लग्नासाठी टाळाटाळ केली.

दि.  31 डिसेंबर रोजी साकीब हा पुन्हा पिडीतेच्या घरी आला. त्यावेळी लग्नाच्या मागणीवरुन दोघांमध्ये वाद झाले. त्यानंतर 14 जानेवारी 2025 रोजी साकिब पुन्हा पिडीतेच्या घरी आला व झाल्या प्रकाराची माफी मागू लागला. मात्र लग्नाचे विचारले असता त्याने उडवाउडवीची उत्तरे देऊन टाळाटाळ करु  लागला. याबाबत साकिब हा आपली फसवणूक करत असल्याची बाब लक्षात आल्यानंतर पिडीतेने अंबड पोलीस ठाणे गाठून अत्याचाराची फिर्याद दिली असून, पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक सविता उंडे करीत आहे. 

इतर बातम्या
Join Whatsapp Group