सुरेश धस यांचा धनंजय मुंडेंवर निशाणा, थेट पुरावेच दाखवले!
सुरेश धस यांचा धनंजय मुंडेंवर निशाणा, थेट पुरावेच दाखवले!
img
दैनिक भ्रमर

मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणावरून  संपूर्ण राजकीय वातावरण तापले असून धनंजय मुंडे यांच्यावर  टीका केली जात आहे. या हत्या प्रकरणात धनंजय मुंडे यांच्या कार्यकर्त्यांवर संशय असल्याने धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी केली जात आहे. 

दरम्यान, संतोष देशमुख हत्या प्रकरणा भाजपचे आमदार सुरेश धस यांनी आजपर्यंत अनेक धक्कादायक आरोप केले आहे. दरम्यान, आता सुरेश धस यांनी थेट राष्ट्रवादीचे मंत्री धनंजय मुंडे यांच्यावरच आता आरोप केला आहे. ‘परळीमध्ये धनंजय मुंडे पालकमंत्री असताना 37 कोटीची 70 लाख रुपये काम न करता बोगस बिलं उचलली’ असा थेट आरोपच सुरेश धस यांनी केला.

पालकमंत्री यांनी पद भाड्यानं दिलं होतं. त्यावेळी मोठ्या प्रमाणात बोगस बिले उचलली. संजय मुंडे असं या अधिकाऱ्याचं नाव होतं. संजय मुंडे यांच्याकडे कार्यकारी अभियंत्याचां प्रभारी चार्ज देऊन बिलं उचलली. जिल्हा वार्षिक योजना 2021-22अंतर्गत परळी आणि आंबेजोगाई कामे न करता कोट्यवधी बिले उचलली. तब्बल 37 कोटीची 70 लाख रुपये काम न करता बोगस बिलं उचलली. एवढंच नाहीतर सार्वजनिक बांधकाम विभागात नऊ कामाचे १३ कोटी बोगास बिले दिली. काम मात्र काम केलीच नाही, असा आरोप सुरेश धस यांनी केला.

तसंच, अर्थ संकल्पामध्ये परळी पुस बर्दापुर काम दिलं होतं. पण ते काम न करता बिलं उचलली. क्षेत्रीय अधिकारी यांनी पाहणी केली असता एकाच कामाचे दोन वेळा बिल उचली असल्याचं समोर आलं होतं. 25/3/2020 मध्ये 57 कामाच्या प्रशासकीय मान्यता रद्द केली. मात्र 14 कोटीचे बिले उचलली. अंबेजोगाईच्या कार्यकारी अभियंत्याने बिले दिली होती. परळी मतदार संघात 13/12/2021 ते 31/3/2022 कालावधीत परळी मतदारसंघात 73 कोटी 36 लाख बिले उचलली आहेत. माननीय पालकमंत्री आणि सामजिक न्यायमंत्री असताना ही बिले उचलली, असं म्हणत सुरेश धस यांनी धनंजय मुंडे यांच्यावर निशाणा साधला.

संजय मुंडे हा अधिकारी निवृत्त झाला, पण ते सापडत नाहीत, डेप्युटी इंजिनियर गायब आहे. दादांनी एवढं प्रेम करु नये की 73 कोटीची बिल उचलली जातील. मी धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी केली नाही. पण उद्या होणाऱ्या बैठकीत हे मुद्दे मांडणार आहे, असंही सुरेश धस म्हणाले.
इतर बातम्या
Join Whatsapp Group