निवडणूक शपथपत्र प्रकरणात देवेंद्र फडणवीस दोषमुक्त
निवडणूक शपथपत्र प्रकरणात देवेंद्र फडणवीस दोषमुक्त
img
Dipali Ghadwaje
नागपूर : निवडणूक शपथपत्रात दोन गुन्ह्यांची नोंद नसल्याचं प्रकरणात राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दोषमुक्त झाले आहेत.उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना न्यायालयाने मोठा दिलासा दिला आहे. २०१४ च्या विधानसभा निवडणूकीतील उमेदवारी अर्जात दोन गुन्हे दडवल्या प्रकरणात देवेंद्र फडणवीसांना नागपूरच्या जिल्हा आणि सत्र न्यायालयाने दोषमुक्त केले आहे.
 
याबाबत मिळालेली सविस्तर माहिती अशी की, २०१४ मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीसाठी दाखल केलेल्या उमेदवारी अर्जासोबतच्या शपथपत्रात फडणवीस यांनी त्यांच्याविरुद्ध दाखल दोन गुन्ह्यांची माहिती दडवली, असा दावा करणारी याचिका अ‍ॅड. सतीश उके यांनी दाखल केली आहे.

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी निवडणूक शपथपत्रामध्ये गुन्ह्याची माहिती दडवल्याचा दावा अ‍ॅड. सतीश उके यांनी केला होता. याप्रकरणी प्रथम श्रेणी न्याय दंडाधिकारी संग्राम जाधव यांनी सर्व पक्षांची बाजू ऐकूण घेत यावर निर्णय जाहीर केला.

देवेंद्र फडणवीस यांच्याविरोधातील दोन गुन्हे हे खाजगी स्वरुपाच्या होते. जे गुन्हे लपवले त्याचा निवडणुकीवर कोणताही परिणाम होणार नसल्याचे मत न्यायालयाने मांडले. त्यामुळेच या प्रकरणी फडणवीसांना दोषमुक्त करण्यात आले आहे. नागपूरच्या जिल्हा व सत्र न्यायालयातील प्रथम श्रेणी न्यायदंडाधिकाऱ्यांनी हा निर्णय दिला. 
इतर बातम्या
Join Whatsapp Group