वर्षा बंगल्यावर कधी राहायला जाणार? जादूटोणाच्या आरोपांनंतर देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया
वर्षा बंगल्यावर कधी राहायला जाणार? जादूटोणाच्या आरोपांनंतर देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया
img
Dipali Ghadwaje
मुंबई : महाराष्ट्रात नवं सरकार स्थापन होऊन आता दोन महिने होत आली आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेऊन 50 पेक्षा जास्त दिवसांचा कालावधी लोटला असला तरी ते अजूनही त्यांच्या अधिकृत शासकीय निवासस्थानी निवासासाठी गेलेले नाहीत.

राज्याच्या मुख्यमंत्र्यांसाठी 'वर्षा' हे शासकीय निवासस्थान आहे. निवडून आलेला प्रत्येक मुख्यमंत्र्यांना प्रोटोकॉलनुसार वर्षा निवासस्थानी निवासासाठी जावं लागतं. कारण तिथे सर्व व्यवस्था आणि यंत्रणा आहे. पण दोन महिने होत आली तरी मुख्यमंत्री वर्षा निवासस्थानी राहण्यासाठी न गेल्याने राजकीय वर्तुळात विविध चर्चांना उधाण आलं आहे.

दरम्यान  मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस वर्षा बंगल्यावर रहायला कधी जाणार? असा प्रश्न संजय राऊत यांच्याकडून सातत्याने विचारला जातोय. “कामाख्या देवीला रेडे कापले त्यांची शिंग लॉनमध्ये खोदकाम करून तिथे पुरली आहेत” असा दावा काल संजय राऊत यांनी केला होता.

देवेंद्र फडणवीस म्हणाले की, ‘मुलीची 10 वी ची परिक्षा संपल्यावर वर्षावर रहायला जाणार आहे’ “शिंदेंनी वर्षा सोडल्यावर मला तिथे जायचं आहे. त्याच्यापूर्वी काही छोटी-मोठी कामं तिथे चालू होती. दरम्यानच्या काळात माझी मुलगी १० व्या वर्गात आहे, 17 तारखेपासून तिची परीक्षा सुरु होत आहे. ती म्हणाली परीक्षा झाल्यानंतर तिथे शिफ्ट होऊ. म्हणून मी काही शिफ्ट झालो नाही. परीक्षा झाल्यावर शिफ्ट होईन” असं देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं.
 
इतर बातम्या
Join Whatsapp Group