पुणे : राज्याचे सहकारमंत्री दिलीप वळसे पाटील यांना गंभीर दुखापत झाली आहे. मंत्री दिलीप वळसे पाटील यांचा अपघात झाला आहे. दरम्यान वळसे पाटील यांना हात, पाय आणि पाठीला दुखापत झाल्याची माहिती समोर येत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, वळसे पाटील रात्री अंधारात लाईट सुरु करायला जात असताना पाय घसरुन पडले. दिलीप वळसे पाटलांवर पुण्यातील औध येथील खाजगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत. वळसे पाटील यांची सध्या प्रकृती स्थिर आहे. मात्र त्यांच्यावर 12 ते 15 दिवस रुग्णालयात उपचार सुरु रहातील असा अंदाज वर्तवण्यात येतोय.याच रुग्णालयात त्यांच्यावर शस्त्रक्रिया पार पडणार आहे.
ऐन लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर दिलीप वळसे पाटलांवर निवडणूकीची मोठी जबाबदारी असताना दुखापत झाली आहे. शिरुरचे अजित पवार गटाचे आमदार शिवाजी आढळराव पाटील यांच्या प्रचाराची प्रमुख जबाबदारी दिलीप वळसे पाटील यांच्यावर आहे.