पराभवानंतरही बक्षीस, उज्ज्वल निकमांची पुन्हा विशेष सरकारी वकीलपदी नियुक्ती
पराभवानंतरही बक्षीस, उज्ज्वल निकमांची पुन्हा विशेष सरकारी वकीलपदी नियुक्ती
img
Dipali Ghadwaje
लोकसभेच्या निवडणुकीत भाजपाचे उमेदवार म्हणून ऍड उज्वल निकम यांनी निवडणूक लढवलेली असताना त्यांची सरकारी वकील पदावर नियुक्ती करण्यात आलेली आहे.

राजकीय पक्षाच्या कार्यकर्त्याची सरकारी वकील पदावर नियुक्ती करुन भाजपा सरकार चुकीचा पायंडा पाडत आहे. उज्ज्वल निकम यांच्या सरकारी वकील पदाच्या नियुक्तीस काँग्रेस पक्षाचा तीव्र विरोध असून सरकारने त्याचा फेरविचार करावा, अशी मागणी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी केली आहे.

उज्जल निकम यांना पराभवानंतही बक्षीस

उत्तर मध्य मुंबई लोकसभा मतदारसंघात काँग्रेसच्या वर्षा गायकवाड यांनी उज्जल निकम यांचा पराभव केला. लोकसभा निवडणुकीसाठी उज्ज्वल निकम यांनी आपल्या विशेष सरकारी वकिल पदाचा राजीनामा दिला होता. पण पराभवानंतरही त्यांना बक्षीस मिळालं आहे. उज्ज्वल निकम यांची सरकारी वकीलपदी पुन्हा फेरनियुक्ती करण्यात आली आहे. 
   
दरम्यान उज्ज्वल निकम यांच्या फेरनियुक्तीला काँग्रेसने जोरदार विरोध केला आहे. राज्य सरकारने न्याय व्यवस्थेच्या माध्यमातून पाप केलं, उज्वल निकम भाजपचे लोकसभेचे उमेदवार असताना त्यांना सरकारी वकील करून त्यांनी सिद्ध केलं की सरकारी वकीलही भाजपचे राहणार. पण भाजपच्या उमेदवाराला सरकारी वकील करता येणार नाही, ही भूमिका काँग्रेस पक्षाची आहे, असं नाना पटोले यांनी म्हटलं आहे. 

 

 
इतर बातम्या
Join Whatsapp Group