मोठी बातमी! भारताच्या
मोठी बातमी! भारताच्या "या" माजी क्रिकेटपटूचा भाजपात जाहीर प्रवेश
img
Dipali Ghadwaje
राज्यात लवकरच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीची घोषणा होणार आहे. त्यामुळे आता वेगवेगळ्या शहरांत आपली ताकद वाढवण्याचा प्रयत्न सर्वच प्रमुख पक्षांकडून केला जात आहे. आज (8 एप्रिल) अन्य पक्षांच्या अनेके नेते तसेच पदाधिकाऱ्यांनी भाजपात जाहीर प्रवेश केला.

विशेष म्हणजे कधीकाळी क्रिकेटचे मैदान गाजववलेल्या भारताचा दिग्गज आणि मराठमोळा क्रिकेटपटू केदार जाधव यानेदेखील भाजपात जाहीर प्रवेश केला आहे. मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीत हा पक्षप्रवेश सोहळा पार पडला.

मुंबईतील कार्यक्रमात केला भाजपात प्रवेश

क्रिकेटच्या मैदानावर धावांचा पाऊस पाडणाऱ्या केदार जाधवने आता भाजपात प्रवेश केला  आहे. भाजपात सामील होत त्याने आपली राककीय इनिंग सुरू केली आहे. मंगळवारी मुंबईत आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात केदार जाधव याने मंत्री तथा भाजपाचे नेते चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीत भाजपात प्रवेश केला आहे. केदार जाधवचे भापजात येणे हे आमच्यासाठी खूप आनंद देणार आहे, असे म्हणत बावनकुळे यांनी केदाज जाधवचे स्वागत केले.
 
इतर बातम्या
Join Whatsapp Group