शपथ घेणाऱ्या मंत्र्यांना अडीच वर्षाचा काळ; अजित पवारांची माहिती
शपथ घेणाऱ्या मंत्र्यांना अडीच वर्षाचा काळ; अजित पवारांची माहिती
img
दैनिक भ्रमर
बहुप्रतीक्षित महायुतीच्या ]मंत्रिमंडळाचा आता थोड्याच वेळात शपथविधी होईल. त्यापूर्वीच अजित पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील मंत्री पदाचा एक फॉर्म्युला सांगीतला आहे. अजित पवार यांनी राष्ट्रवादी कांग्रेस पक्षात अडीच-अडीच वर्षासाठी मंत्रिपदाचं वाटप करण्यात येणार असल्याची माहिती दिली. 

त्यामुळे कोणी नाराज होऊ नये, असे ते म्हणाले. मंत्रिमंडळात सगळ्यांना संधी देत नाही. काही जणांना मागच्या वेळी दीड वर्ष टर्म मिळाली. आम्ही आता ठरवलं आहे. आता ५ वर्षात मंत्र्यांना अडीच अडीच वर्ष टर्म देण्यात येणार आहे. आमच त्यावर एकमत झालं आहे. सध्या शपथ घेणाऱ्या मंत्र्यांना अडीच वर्षाचा काळ मिळणार आहे, असे अजित पवार म्हणाले. 
इतर बातम्या
Join Whatsapp Group