धक्कादायक! जिल्हा परिषद शाळेत जादूटोण्याचा प्रकार , विद्यार्थ्यांमध्ये घबराट ; नेमकं काय घडलं?
धक्कादायक! जिल्हा परिषद शाळेत जादूटोण्याचा प्रकार , विद्यार्थ्यांमध्ये घबराट ; नेमकं काय घडलं?
img
Dipali Ghadwaje
महाराष्ट्रातल्या सगळ्याच संतांनी अंधश्रद्धेवर प्रहार केला आहे. राज्यात अंधश्रद्धा आणि जादूटोणा विरोधी कायदा आहे. अंधश्रद्धा निर्मूलन समिती आणि काही सजग संस्थाही अंधश्रद्धेविरोधात बोट ठेवत जनजागृती करत असतात. मात्र तरीही अनेक ठिकाणी अगदी शहरापासून ते खेड्यापर्यंत करणी, जादूटोणा असे प्रकार आढळून येत आहेत. 

पुरोगामी महाराष्ट्राला काळीमा फासणारी  घटना समोर आली आहेजालना जिल्ह्यातील गोंदीमध्ये  चक्क शाळेमध्ये जादूटोण्याचा प्रकार घडल्यानं खळबळ उडाली आहे. जालन्यातील जिल्हा परिषदेच्या शाळेत बांगड्या, हळदी-कुंकू आणि बाहुली सापडली आहे.  

जालन्यातील गोंदी येथे जिल्हा परिषदेच्या शाळेत जादूटोण्यासारखं कृत्य केल्याची माहिती समोर आली आहे. या प्रकरणामुळे विद्यार्थ्यांमध्ये भीतीचे वातावरण असल्याच चित्र पहायला मिळत आहे.

शालेय व्यवस्थापन समितीने पोलिसांना या प्रकरणामध्ये निवेदन दिल्याची माहिती शाळेचे मुख्याध्यापक एस. एस. गडदे यांनी दिली आहे. गोंदी येथील जिल्हा परिषद शाळेतील वर्गामध्ये बांगड्या, हळद-कुंकू वाहिलेली बाहुली  आढळून आली. 

वर्गात हळद-कुंकू लावलेली, बांगड्या वाहिलेली बाहुली पहिल्यांदा नववीच्या वर्गातील विद्यार्थ्यांनी पाहिली. हा सारा नेमका काय प्रकार आहे हे या मुलांना आधी कळलं नाही. मात्र ही बाहुली आणि सर्व पसारा अगदी जवळ जाऊन पाहिल्यानंतर घाबरलेल्या विद्यार्थ्यांनी वर्गातून पळ काढला. त्यानंतर या प्रकरणाची गावभर चर्चा झाली. या प्रकारामुळे विद्यार्थ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

दरम्यान, गोंदी येथील जिल्हा परिषद शाळेतील सीसीटीव्ही कॅमेरे देखील काही दिवसापूर्वीच चोरी गेल्याची माहिती समोर आली आहे. याप्रकरणी शालेय व्यवस्थापन समितीने तपास सुरु असून पोलिसांना सदर घटनेची माहिती कळवली आहे. अद्याप याप्रकरणी गुन्हा दाखल झालेला नाही.
 
इतर बातम्या
Join Whatsapp Group