राज्याच्या राजकरणातून एक महत्वाची बातमी समोर आली आहे. फेब्रुवारी महिन्याच्या अखेरीस भाजपमध्ये मोठा उलटफेर होण्याची शक्यता आहे. भाजपला नवे राष्ट्रीय अध्यक्ष मिळणार आहेत.
एका वृत्त संस्थेने दिलेल्या माहितीनुसार , पक्षाच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार जानेवारीच्या मध्यापर्यंत निम्म्या राज्यांमध्ये निवडणूक प्रक्रिया पूर्ण होणार आहे. तसेच इतर राज्यातील प्रदेशाध्यक्षांचा कार्यकाळही संपणार आहे, त्यामुळे राष्ट्रीय अध्यक्षांसह राज्यातील प्रदेशाध्यक्ष देखील बदलले जाणार आहेत.
जेपी नड्डा यांच्याकडे अध्यक्षपदाची जबाबदारी २०२० पासून आहे. यासह त्यांच्याकडे केंद्रीय आरोग्य मंत्रिपदाची जबाबदारी आहे. एका ज्येष्ठ नेत्याने सांगितले की, भाजपचे नवे अध्यक्ष फेब्रुवारीअखेरीस या पदाची सूत्रे स्वीकारू शकतात. नवा अध्यक्ष हा सरकारचा किंवा संघटनेचाही असू शकतो, असे ते म्हणाले.
दरम्यान याबाबतचा अंतिम निर्णय झालेला नाहीये. भाजप अध्यक्षांचा कार्यकाळ तीन वर्षांचाच असतो. दरम्यान २०२४च्या लोकसभा निवडणुकीसाठी जेपी नड्डा यांच्या कार्यकाळ वाढवण्यात आला होता.
दरम्यान सार्वत्रिक निवडणुकीत भाजपचं कमबॅकही झालं. भाजपमध्ये अध्यक्षपदाची चर्चा अनेक दिवसांपासून सुरू आहे. ऑगस्टमध्येही याबाबत चर्चा झाली होती पण त्यावेळी महाराष्ट्र, झारखंड आणि जम्मू-काश्मीर, हरियाणाच्या निवडणुका जवळ आल्या होत्या. त्यामुळे नड्डा यांचा कार्यकाळ वाढवण्यात आला होता.