IRCTC ची वेबसाइट ठप्प, नेमकं काय कारण?
IRCTC ची वेबसाइट ठप्प, नेमकं काय कारण?
img
DB
आत्ताच एक महत्वाची बातमी समोर आली आहे.  IRCTC ची वेबसाइट ठप्प झाली आहे. त्यामुळे रेल्वे तिकीटांची बुकिंग बंद झाली आहे. यामुळे प्रवाशांना त्रास सहन करावा लागतोय. महत्त्वाच म्हणजे तत्काळ तिकीट बुकिंगच्यावेळी ही IRCTC ची वेबसाइट ठप्प झाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार , IRCTC ने स्टेटमेंट जारी करुन साइटच्या मेंटेनेंसच काम चालू असल्याच सांगितलं. त्यामुळे पुढचा 1 तास IRCTC वरुन कुठलही बुकिंग करता येणार नाहीय.

IRCTC ची सर्विस डाऊन झाल्यामुळे तात्काळ तिकिट बुक करणाऱ्यांना अडचणी येत आहेत.  डाउनडिटेक्टरने वेबसाइटच्या आउटेजची पुष्टि केली आहे. IRCTC सर्विस डाउन झाल्यानंतर एक्स वर TATKAL आणि IRCTC दोन कीवर्ड ट्रेंड करत आहेत. सामान्यत: मेंटेनेंसच काम रात्री 11 वाजल्यानंतर चालतं. हा सायबर हल्ला तर नाही ना, अशी शंका उपस्थित केली जात आहे.
 

 
इतर बातम्या
Join Whatsapp Group