मंत्रिमंडळ विस्तारात अनेक इच्छुकांच्या पदरी निराशाच आली. राष्ट्रवादी काँग्रेसचे दिग्गज नेते छगन भुजबल यांनी आपली नाराजी बालून दाखवली होती. आता शिंदेंच्या शिवसेनेचे आमदार विजय शिवतारे यांनी मंत्रिपद न मिळाल्यामुळे आपली नाराजी बोलून दाखवली.
अब्दुल सत्तार, तानाजी सावंत आणि दीपक केसरकर यांनाही मंत्रिपदाने हुलकावणी दिली. विजय शिवतारे यांचेही नाव मंत्रिपदासाठी आघाडीवर होते, पण ऐनवेळी त्यांच्या नावावर फुली पडली आहे. शिवतारे यांनी आपल्या मनातील खंत बोलून दाखवली. शेवटपर्यंत माझं नाव हतं. पण ऐनवेळी नाव कट झाले, त्यामुळे नाराज आहे, असे विजय शिवतारे म्हणाले.
महाराष्ट्रात कर्तृत्वावर काम केले, यावर जे सर्व चालायचे ते आता आपण बिहारकडे जातोय . बिहार जे आज आहे ते जातीयवादावर राजकारण आहे. आपण सगळे तिकडे जातोय, अशी टीका शिवतारे यांनी केली.
मला मंत्रिपद मिळाले की नाही, हे महत्त्वाचे नाही. लोकांची कामे होणे हे महत्त्वाचे आहे. विभागानुसार नेतृत्व दिली जायची. त्यांच्या हातात सत्ता देत, महाराष्ट्र आम्ही पुढे नेला होता. पण आपण बिहारच्या दिशेने जात आहोत. जातीयवादीपणा सुरु आहे, असा हल्लाबोल यावेळी शिवतारे यांनी केला.
मला अडीच वर्ष मंत्रिपद दिले तरी मी घेणार नाही. लोकांना विश्वासात घेऊन काम व्हायला हवं होत. कार्यकर्ते गुलाम नाही. अडीच वर्ष मंत्रिपद मिळालं तरी मला ते नको, असे म्हणत विजय शिवतारे यांनी नाराजी व्यक्त केली. शेवटपर्यंत नाव होतं पण ऐनवेळी नाव कट झालं, त्यामुळे नक्कीच नाराजी आहे. विश्वासात घेऊन सर्व व्हायला हवं होतं, असेही शिवतारे म्हणाले.