महायुती सरकारच्या बहुप्रतिक्षित मंत्रिमंडळाचा विस्तार तर झाला पण खातेवाटप व्हायचं काही नाव घेईना. महत्त्वाच्या खात्यांसाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार हे कमालीचे नाराज असल्याचे समोर आले आहे. त्यामुळे खातेवाटप लांबणीवर पडल्याची चर्चा रंगली आहे. अशातच शिवसेनेचे मंत्री उदय सामंत यांनी बुधवारी १२ वाजेपर्यंत खातेवाटप जाहीर होईल असा दावा केला आहे.
महायुती सरकारचं पहिलं हिवाळी अधिवेशन नागपूरमध्ये सुरू आहे. पण अधिवेशनाच्या तिसऱ्या दिवशीही अजूनही मंत्र्यांचे खातेवाटप झालेले नाही याच दरम्यान मोठी माहिती समोर येत आहे.खातेवाटपाबद्दल विचारले असता शिवसेनेचे मंत्री उदय सामंत यांनी याबाबद्दल स्पष्टचं सांगितलं. बुधवारी १२ वाजेपर्यंत खातेवाटप जाहीर होईल असा दावा शिवसेनेचे मंत्री उदय सामंत यांनी केला आहे.
तसेच, “आमच्या गटात कुणीही नाराज नाही. जोरदार चर्चा आणि सूत्रांवर माझा आक्षेप आहे. खाते कोणते मिळणार तिन्ही नेते समन्वयानं खातेवाटप करत आहेत. मी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना सांगणार आहे की, या सूत्रांवर काही तरी तोडगा काढा. बुधवारी 12 वाजेपर्यंत खातेवाटप जाहीर होईल. अजून 48 तास व्हायचे आहे. रात्री 12 वाजता सुद्धा खातेवाटप होईल, असं सामंत यांनी सांगितलं.