५ डिसेम्बर २०२४
राज्याच्या राजकारणातील सर्वात मोठी बातमी समोर आली आहे. देवेंद्र फडणवीस यांनी तिसऱ्यांदा मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली असून ते राज्याचे २१ वे मुख्यमंत्री म्हणून त्यांनी आज आझाद मैदानावर सीएम पदाची शपथ घेतली.
त्यांच्याबरोबर एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. या शपथविधीसाठी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी , केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, जेपी नड्डा तसेच इतर भाजप शासित राज्यातील मुख्यमंत्री सुद्धा या सोहळ्याला आले होते.
Copyright ©2026 Bhramar