सरपंच संतोष देशमुख हत्येप्रकरणातील आरोपींना फाशी देण्याची ''या''  खासदाराने केली मागणी
सरपंच संतोष देशमुख हत्येप्रकरणातील आरोपींना फाशी देण्याची ''या'' खासदाराने केली मागणी
img
दैनिक भ्रमर

केज तालुक्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येचे पडसाद संपूर्ण राज्यात उमटत आहे. या प्रकरणाने संपूर्ण राजकारण ढवळून निघाले आहे. दरम्यान,  या प्रकरणातील आरोपींना फाशी देण्यात यावी ,अशी मागणी खासदाराकडून करण्यात आली आहे.  या प्रकरणात तीन आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे. मात्र मुख्य आरोपी अद्याप अटकेत नसल्याने घटनेचा निषेध व्यक्त केला जात आहे . दरम्यान , या प्रकरणी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचे बीडचे खासदार बजरंग सोनावणे आक्रमक झाले आहेत.

बीड जिल्ह्यातील वाढत्या गुन्हेगारीबरोबरच संतोष देशमुख हत्याप्रकरणाचा बजरंग सोनवणे यांनी मुद्दा सोमवारी लोकसभेत उपस्थित केला. संसदेच्या हिवाळी अधिवेशन सुरू असतानाच सोनवणे यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांचीही भेट घेतली होती. त्यानंतर आता त्यांनी लोकसभेतही बीडमधील कायदा-सुव्यवस्थेचा मुद्दा मांडला.आज तो त्यांनी लोकसभेत मांडला आहे.

बीड जिल्ह्यात कायदा सुव्यवस्था राहिलेली नाही.संतोष देशमुख हत्या प्रकरणाची सखोल चौकशी झाली पाहिजे . तसेच जे या प्रकरणातील मारेकरी आहेत त्यांना फाशीची शिक्षा व्हावी, अशी मागणी बजरंग सोनावणे यांनी लोकसभेत मागणी केली. संतोष देशमुख यांच्या खूनप्रकरणी आम्हाला न्याय हवाय… संतोष देशमुख यांच्या क्रूर खूनप्रकरणातील सर्व मारेकऱ्यांना अटक करून त्यांना फाशीची शिक्षा द्यावी, अशी मागणी आज त्यांनी संसदेत केलं. तसेच दोषींवर कठोर कारवाई होईपर्यंत आम्ही शांत बसणार नाही.


इतर बातम्या
Join Whatsapp Group