बीड प्रकरण  : CID कडून वाल्मीक कराड यांच्या बायकोसह अजून 4-5 महिलांची कसून चौकशी सुरू
बीड प्रकरण : CID कडून वाल्मीक कराड यांच्या बायकोसह अजून 4-5 महिलांची कसून चौकशी सुरू
img
दैनिक भ्रमर
मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणाने संपूर्ण महाराष्ट्र हादरला या प्रकरणारून   राजकीय वातावरण तापले आहे. तसेच विरोधकांकडून अनेक आरोप प्रत्यारोप सुरु असून हा तपास आता CID कडे सोपवला असून  या प्रकरणी आतापर्यंत चार आरोपीला अटक करण्यात आली आहे. तर तीन आरोपी फरार आहेत.  या प्रकरणाचा तपास सीआयडी करत असून गेल्या तीन दिवसापासून सीआयडीचे वरिष्ठ अधिकारी जिल्ह्यात तळ ठोकून आहेत. सीआयडी खंडणी ॲट्रॉसिटी आणि हत्या या तीन प्रकरणाचा तपास करत आहे. खंडणी प्रकरणात सीआयडीने वाल्मीक कराड यांची पत्नी मंजली कराड यांची आज पुन्हा चौकशी केली.

राष्ट्रवादी अजित पवार गटाचे जिल्हाध्यक्ष राजेश्वर चव्हाण आणि वाल्मीक कराड यांचे अंगरक्षक यांची देखील चौकशी करण्यात आली आहे. तसेच चार ते पाच महिलांना बीड शहर पोलीस ठाण्यात सीआयडीने चौकशीसाठी बोलवले आहे गेल्या तीन तासापासून त्यांची चौकशी सुरू आहे. अद्याप त्यांची नावे समोर आली नसली तरी खंडणी प्रकरणातील आरोपीच्या जवळचे असल्याचे सूत्राकडून माहिती मिळत आहे.

दरम्यान , मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येप्रकरणी आता पोलिस आणि सीआयडीकडून तपासाची सूत्रे वेगाने फिरवली जात आहे. देशमुख  हत्येच्या निषेधार्थ बीडमध्ये मूक मोर्चा काढण्यात आला. एकीकडे राज्यातून या हत्येवरुन संतापाची लाट उसळली आहे. मंत्री धनंजय मुंडे यांचे निकवर्तीय असले्या वाल्मिक कराडला या प्रकरणात अटक करण्याची मागणी सर्वपक्षीय नेत्यांनी केली. वाल्मिक कराड सध्या फरार असून सध्या सीआयडी आणि पोलीस त्याच्या मागावर आहेत.

इतर बातम्या
Join Whatsapp Group