सरपंच संतोष देशमुख हत्याप्रकरण: अंजली दमानिया यांना गुन्हे शाखेची नोटीस, काय आहे प्रकरण ?
सरपंच संतोष देशमुख हत्याप्रकरण: अंजली दमानिया यांना गुन्हे शाखेची नोटीस, काय आहे प्रकरण ?
img
दैनिक भ्रमर
बीडमधील  मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांचं हत्या प्रकरणाने अक्खा महाराष्ट्र हादरला आहे.  या प्रकरणात राजकीय कनेक्शन्स असल्याचे आरोप होत आहेत. राज्यभरात विविध ठिकाणी आंदोलनं आणि मोर्चे काढले जातायत. फरार आरोपींच्या अटकेची मागणी केली जात आहे. या प्रकरणात बीड जिल्हाधिकारी कार्यालयावर काल शनिवारी सर्वपक्षीय मोर्चा काढण्यात आला. या मोर्च्यात अनेकांना या कुटुंबाला न्याय मिळावा आणि बीड येथील गुन्हेगारीवर अंकुश बसावा अशी मागणी केली. या प्रकरणात तीन आरोपी अजूनही फरार आहेत. 

 दरम्यान, या प्रकरणातील तीन फरार आरोपींचा मृतदेह कर्नाटक सीमेवर आढळण्याचा कॉल आपल्याला आल्याचा दावा सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी केला होता. त्यामुळे बीड गुन्हे शाखेने अंजली दमानिया यांना नोटीस पाठवली आहे. या प्रकरणातील माहिती आणि पुरावे सादर करावेत अशी नोटीस गुन्हे शाखेने दिली आहे. या संदर्भात आपण आपल्याकडील व्हॉईस कॉल डिटेल्स पोलिसांना दिल्याचे अंजली दमानिया यांनी म्हटले आहे.
इतर बातम्या
Join Whatsapp Group