सरपंच  संतोष देशमुख हत्याप्रकरण : वाल्मिक कराड कुठे लपून बसला ?  मोठी  माहिती समोर
सरपंच संतोष देशमुख हत्याप्रकरण : वाल्मिक कराड कुठे लपून बसला ? मोठी माहिती समोर
img
दैनिक भ्रमर
बीडमधील  मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्याप्रकरणाने संपूर्ण महाराष्ट्र हादरला तसेच राज्यातील राजकीय वातावरण तापले. या घटनेवर विविध स्तरांतून प्रतिक्रिया येत असून  या घटनेचा निषेध केला जात आहे. दरम्यान, संतोष देशमुख यांच्या हत्येचा मास्टरमाईंड वाल्मिक कराड असल्याचे बोलले जात आहे. वाल्मिक कराड हा मंत्री धनंजय मुंडे यांच्या जवळचा आहे, असा आरोप संतोष देशमुख यांचे कुटुंबीय आणि गावकऱ्यांकडून केला जात आहे. सध्या बीड हत्या प्रकरणाची चौकशी सीआयडीकडून केली जात आहे. तर दुसरीकडे या प्रकरणाची चौकशी बीड पोलीसही करत आहेत. त्यात आता वाल्मिक कराडबद्दल एक महत्त्वपूर्ण माहिती समोर आली आहे.

संतोष देशमुख हत्याप्रकरणाचा मास्टरमाईंड असलेला वाल्मिक कराड हा महाराष्ट्रातच असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. वाल्मिक कराड हा महाराष्ट्राच असून सीआयडीचे विशेष पथक त्याच्या शोधासाठी रवाना झाले आहे. आजपासून सीआयडीच्या आणखी ४ टीम वाल्मिक कराडचा शोध घेणार आहेत. दरम्यान , सीआयडीकडून या प्रकरण खंडणी, हत्या, अॅट्रोसिटी प्रकरणातील फरार आरोपींची बँक खाती गोठवण्यात आली आहेत. यात वाल्मिक कराडची १०० हून अधिक बँक खाती गोठवली गेली आहे.
इतर बातम्या
Join Whatsapp Group