बीडचे मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणाने संपूर्ण महाराष्ट्र हादरला असून या प्रकरणाविषयी विविध स्तरांतून अनेक प्रतिक्रिया येत आहेत दरम्यान आता या प्रकरणातून एक धक्कादायक माहिती समोर आली आहे.
सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्याप्रकरणाचा तपास सीआयडीकडे सोपवण्यात आला असून सीआयडी तपासात धक्कादायक माहिती समोर आली आहे. संतोष देशमुख यांच्या हत्येवेळी एका वरिष्ठ नेत्याला 16 फोन आरोपीच्या मोबाईलमधून करण्यात आले होते, अशी माहिती खात्रीलायक सुत्रांकडून समोर आली आहे.
संतोष देशमुख यांच्या हत्येवेळी मारहाण केलेला व्हिडिओ सीआयडी हाती आला आहे. आरोपी सुदर्शन घुले यांच्या मोबाईलमधील व्हिडिओ सीबीआयच्या ताब्यात आलाय. खात्रीलायक सूत्रांची याची माहिती दिली आहे. हत्या करून फरार होताना गाडी सोडून फरार आरोपी निघून गेले, यावेळी पोलिसांनी स्कार्पिओ गाडी ताब्यात घेतली. त्यात दोन मोबाइल आढळून आले. त्यावरून आरोपीच्या मोबाईलमधून हत्येच्या वेळी 16 कॉल एका वरिष्ठ नेत्याला केले गेले होते, अशी माहिती खात्रीलायक सुत्रांकडून समोर आली आहे.
दरम्यान , संतोष देशमुख हत्या प्रकरणात सीआयडीने तपासासाठी तीन पथक तयार केले आहेत. सीआयडीने अनेकांचे कॉल रेकॉर्ड काढण्यास सुरुवात केली आहे. त्याशिवाय, वाल्मिक कराड यांचे दोन्ही अंगरक्षकांचे मोबाईल फोन फॉरेन्सीक तपासणीसाठी जप्त केले आहेत. आज सीआयडीचे पथक संतोष देशमुख हत्या प्रकरणाच्या तपासासाठी आणि चौकशीसाठी मस्साजोगला जाण्याची शक्यता आहे.