मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्याकांडाने संपूर्ण महाराष्ट्र हादरुन गेला आहे . या प्रकरणाचा तपास आता सीआयडीकडे देण्यात आला आहे. संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपींची संख्या आता 4 वर गेली आहे . दरम्यान , संतोष देशमुख यांचा शवविच्छेदनाचा अहवाल सीआयडीकडे जमा करण्यात आला आहे.अशातच देशमुख यांचा शवविच्छेदनाचा अहवाल हा सीआयडीकडे सोपवण्यात आला आहे. या अहवालामध्ये धक्कादायक माहिती समोर आली आहे. देशमुख यांच्या मृत्यूचं कारणही समोर आलं आहे. तसंच देशमुख यांचे डोळे लायटरने फोडण्यात आले की नाही याबद्दल डॉक्टरांनी दुजोरा दिला नाही.
संतोष देशमुख यांना बेदम मारहाण करण्यात आली होती. दुखापत झाल्यामुळे अतिप्रमाणात रक्तस्त्राव झाला, शॉकमध्ये गेल्याने मृत्यू देशमुख यांचा मृत्यू झाला होता. एकूण ८ पाणाचा हा अहवाल आहे. सर्व अवयव छाती, हात, पाय, चेहरा, डोके याला जबर मार लागला आहे. देशमुख यांच्या चेहऱ्यावर मार लागला आहे. डोळे काळे निळे झाले आहे. मात्र डोळे जाळण्याच्या प्रकाराला राज्यजिल्हाशल्य आणि आरोग्य विभाने दुजोरा दिला नाही. एकूण ३ डॉक्टरांच्या टीमने देशमुख यांचं शवविच्छेदन केलं आहे.