सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणाने संपूर्ण महाराष्ट्र हादरला असून सर्वच स्तरातून या घटनेचा निषेध करण्यात येत आहे. दरम्यान आत अय प्रकरणातील तपासाला वेग आला असून फरार मारेकऱ्यांवर पोलिसांनी बक्षीस जाहीर केलं आहे. अशातच आता आणखी एक माहिती समोर आली आहे. हत्या प्रकरणातील फरार आरोपींना पळून जाण्यास मदत केल्याचा संशय आहे. या प्रकरणी बीडमधील डॉ संभाजी वायबसे यांना ताब्यात घेण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. तर धारूरमधून आणखी एकाला ताब्यात घेतलंय.
मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, एसआयटीच्या टीमने बीडमधील डॉ संभाजी वायबसे यांना ताब्यात घेतलं आहे. वायबसे यांची एसआयटीकडून चौकशी सुरू असल्याची माहिती आहे. तर एसआयटीकडून धारूरमधील आणखी एकाला ताब्यात घेतल्याची सूत्राकडून माहिती आहे. दोघा जणांना पोलीस स्टेशनला आणण्यात आलं आहे. सीआयडीकडून कसून चौकशी सुरू आहे.फरार असलेल्या आरोपींची माहिती मिळवण्यासाठी चौकशी सुरू आहे.
खंडणी आणि सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येचा तपास सीआयडी आणि आता एसआयटी या तीन तपास यंत्रणांच्या माध्यमातून केला जात आहे. आज एसआयटी या संतोष देशमुख प्रकरणातील सर्व आरोपींची चौकशी करण्यात येत आहे. एसआयटीच्या स्थापनेचे आदेश गृहमंत्रालयाने काढल्यानंतर काही तासांमध्येच एसआयटी बीडमध्ये दाखल झाली. एसआयटीने संबंधित अधिकाऱ्यांची भेट घेत तपासाची सगळी माहिती घेतली.दरम्यान , संतोष देशमुख हत्या प्रकरणात सुदर्शन घुले, कृष्णा आंधळे आणि सुधीर सांगळे हे तीन आरोपी फरार आहेत.