सरपंच संतोष देशमुख  हत्या प्रकरणी एक  संशयित  आरोपी ताब्यात, एसआयटी पथक ॲक्शन मोडवर
सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणी एक संशयित आरोपी ताब्यात, एसआयटी पथक ॲक्शन मोडवर
img
दैनिक भ्रमर
मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्याप्रकरणाने संपूर्ण महाराष्ट्र हळहळला. या हत्याप्रकरणाचा विविध स्तरावरून निषेध करण्यात आला. लोकभावनेचा उद्रेक पाहता या प्रकरणात सरकारला गांभीर्याने निर्णय घेण्यास भाग पाडले. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हिवाळी अधिवेशना दरम्यान विशेष चौकशी पथकाची (SIT) घोषणा केली होती. यानंतर बुधवारी एसआयटी स्थापनेबाबत गृह विभागाकडून अधिकृत आदेश काढण्यात आले. हे पथक आयपीएस अधिकारी बसवराज तेली यांच्या नेतृत्त्वातील असून यात 10 अधिकारी आहेत.  

या प्रकरणाचा तपास सीआयडी करत आहे पण त्यातबरोबर सरकारने गठित केलेले विशेष चौकशी पथक (SIT)असून फक्त 24 तासातच हे पथक अॅक्शन मोडवर आले आहे. एसआयटी पथकने संतोष देशमुख खून प्रकरणी एका  संशयित  आरोपीला ताब्यात घेतले आहे.

एसआयटी पथक स्थापन झाल्यानंत दुसऱ्या दिवशी तपासाला वेग आला आहे. 24 तासातच या प्रकरणातील एका  संशयित आरोपीला ताब्यात घेतले आहे. गेल्या दोन तासापासून संशयित आरोपीची एसआयटी पथकाकडून कसून चौकशी करण्यात येत आहे . संशयित आरोपी सरपंच देशमुख खून प्रकरणातील मुख्य आरोपीचा नातेवाईक असल्याची माहिती समोर येत आहे. 

बीडच्या मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात एसआयटीने तपासाची सूत्रे हातात घेतल्यानंतर आज सकाळपासून केज मध्ये तळ ठोकून आहे. केज शहरातील शासकीय विश्रामगृहात एसआयटीचे अधिकारी आयपीएस बसवराज तेली यांनी आज केज पोलीस ठाण्यातील पोलीस अधिकाऱ्यांची व कर्मचाऱ्यांची 2 तास तपासा संदर्भातील माहिती घेण्यासाठी बैठक घेतली. त्यानंतर फरार असलेले आरोपी यांच्या संशयित नातेवाईकांची 2 तासांपासून चौकशी सुरु आहे..
इतर बातम्या
Join Whatsapp Group