सातपूर :- श्रमिकनगर सातमाऊली चौक परिसरात राहणारी एक विवाहित महिला आज सकाळी ज्वलनशील पदार्थामुळे जळाल्याची घटना घडली आहे. दरम्यान, मद्यपी नवऱ्यानेच बायकोच्या अंगावर ज्वलनशील पदार्थ ओतून पेटवून दिल्याची चर्चा परिसरात जोर धरत आहे.
याबाबत मिळालेली माहिती अशी की, आज सकाळी श्रमिकनगर सातमाऊली चौक परिसरात राहणारी एक महिला जळाली होती, तिच्या नवऱ्यानेच दारूच्या नशेत बायकोवर ज्वलनशील पदार्थ ओतून पेटवून दिले असा संशय व्यक्त केला जात आहे. ही घटना शेजारी राहणाऱ्या नागरिकांना समजताच त्यांनी तत्काळ पेटलेल्या महिलेच्या अंगावर पाणी ओतून आग विझवली.
मात्र तो पर्यंत सदर महिला 40-50 टक्के भाजून गंभीर जखमी झाली होती. या महिलेला उपचारासाठी स्थानिक नागरिकांनी तत्काळ नाशिकच्या जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले आहे. पुढील तपास सातपूर पोलीस करीत आहेत. दरम्यान, ही महिला गंभीर भाजल्याने तिची प्रकृती चिंताजनक आहे. तिचे हात, पाय व छातीचा भाग जळाल्याचे समजते.