राजकीय : रायगड-नाशिकच्या पालकमंत्रिपदाचा तिढा  कसा सुटणार ? नेमकं काय घडतंय
राजकीय : रायगड-नाशिकच्या पालकमंत्रिपदाचा तिढा कसा सुटणार ? नेमकं काय घडतंय
img
दैनिक भ्रमर
राज्यात महायुती सरकार स्थापन झाले असून बहुप्रतीक्षित पालकमंत्र्यांची यादी महायुतीकडून जाहीर करण्यात आली. दरम्यान पालकमंत्री  पदावरून मात्र महायुतीतील मंत्र्यांमध्ये पद न मिळाल्याने कमालीची नाराजी पाहायला मिळाली. दरम्यान, नाशिक आणि रायगडचा तिढा अद्यापही कायम  असल्याने हा कसा सोडविला जाणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. 

 नाशिकच्या पालकमंत्रिपदासाठी भाजप आग्रही असून रायगडवर राष्ट्रवादीनं आपला दावा कायम ठेवलाय. या पार्श्वभूमीवर पालकमंत्रीपदाचा तिढा सोडवण्याचं मोठं आव्हान महायुतीच्या नेत्यांसमोर आहे. रायगडच्या पालकमंत्रीपदावरून तर शिवसेना आणि तटकरेंमध्ये आरोप प्रत्यारोप थांबत नाहीयेत. तर नाशिकमध्ये दादा भुसे आणि गिरीश महाजन यांच्यात पालकमंत्रीपदावरून रस्सीखेच आहे.

मात्र याच दरम्यान आता पालकमंत्रिपदाच्या या तणातणीत नाशिक पालकमंत्रिपदाचा तिढा जवळपास मिटल्याची माहिती मिळतेय. नाशिकच्या पालकमंत्री गिरीष महाजन यांचीच नियुक्ती होईल अशी माहिती सूत्रांनी दिलीये. दुसरीकडे मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री योग्य तो निर्णय घेतील, अशी प्रतिक्रिया दादा भुसे यांनी दिली आहे.

रायगडच्या पालकमंत्रीपदावरून शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस आग्रही असल्याने याबाबतच तिढा निर्माण झालाय. रायगडचे पालकमंत्री सोडण्यासाठी राष्ट्रवादी अनुकुल नाहीये. MMR रिजनमध्ये एक तरी पालकमंत्री असावा अशी राष्ट्रवादीची मागणी आहे. तर रायगडच्या पालकमंत्रीपदाचा आग्रह शिवसेनाही सोडत नाहीये. पालकमंत्रीपदावर महायुतीचे नेते तोडगा काढतील असं सूर सर्वांकडूनच आळवला जातोय. तर दुसरीकडे रायगडमधला वाद पालकमंत्री पदासोबत सहपालकमंत्र्यांची नेमणूक करुन मिटवला जाण्याची शक्यता आहे. मात्र या पर्यायाला शिवसेना आमदारांनी धुडकावून लावलंय. या पार्श्वभूमीवर रायगडच्या पालकमंत्रीपदावरून कसा तोडगा काढला जातोय याची उत्सुकता आहे.
इतर बातम्या
Join Whatsapp Group