लाडक्या बहिणीला मे महिन्याचा हप्ता अजूनही मिळाला नाही. त्यामुळे लाखो महिलांचं लक्ष या हप्त्याकडे लागलेलं असतानाच आता लाडकी बहीण योजनेबाबत एक मोठी अपडेट समोर आली आहे.
महिला आणि बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी या योजनेबाबतची मोठी माहिती दिली आहे. लाडक्या बहिणीला कधी हप्ता मिळणार याबाबतचं सुतोवाच आदिती तटकरे यांनी केलं आहे. लवकरच लाडक्या बहिणींना हप्ता मिळणार असल्याचं आदिती तटकरे म्हणाल्या. त्यामुळे या महिलांना मोठा दिलासा मिळाला आहे.
महिला आणि बालविकास मंत्री आदिती तटकरे या मीडियाशी संवाद साधत होत्या. यावेळी त्यांनी ही महत्त्वाची माहिती दिली. लाडकी बहिण योजनेबाबत गैरसमज पसरवला जातोय. ही योजना चालू राहणार आहे. चार महिन्यापूर्वीच्या तपासणीत लक्षात आले होते की, सरकारी महिला कर्मचारी या योजनेचा लाभ घेत आहेत.
तेव्हापासूनच त्यांना लाभ देणे बंद केले आहे, असं सांगतानाच लाडक्या बहिणींना मे महिन्यांचा हप्ता लवकरच दिला जाणार आहे, असं आदिती तटकरे म्हणाल्या.