खळबळजनक  : शनिशिंगणापूर देवस्थानच्या नावाने बनावट ॲप , करोडोंची फसवणूक ;  नेमकं काय प्रकरण?
खळबळजनक : शनिशिंगणापूर देवस्थानच्या नावाने बनावट ॲप , करोडोंची फसवणूक ; नेमकं काय प्रकरण?
img
Dipali Ghadwaje
नगर जिल्ह्यातील शनिशिंगणापूर हे देशात ख्यात असलेल देवस्थान आहे. आता याच देवस्थानची एक अत्यंत महत्त्वाची व खळबळजनक माहिती समोर आली आहे. शैनेश्वर देवस्थानच्या नावाने बनावट ॲप तयार करून कोट्यवधी रुपयांची फसवणूक केल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे.

शनेश्वर देवस्थानच्या अधिकृत ॲपऐवजी कर्मचाऱ्यांनी बनावट ॲप तयार करून भक्तांकडून मोठ्या प्रमाणात रक्कम उकळल्याचा दावा कॉंग्रेसच्या कामगार विभागाने केला आहे. याबाबत पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे. सायबर पोलिसांमार्फत चौकशी सुरू आहे. या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे.

नेमक प्रकरण काय?

याबाबत जिल्हा पोलिस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांच्याकडे कॉंग्रेसच्या कामगार विभागाचे प्रदेशाध्यक्ष संभाजी माळवदे यांनी निवेदन सादर केले आहे. माळवदे यांच्या तक्रारीनुसार शनेश्वर देवस्थानच्या कर्मचाऱ्यांनी बनावट ॲप तयार करून ऑनलाइन पूजेच्या नावाखाली भक्तांकडून पैसे गोळा केले. या ॲपवर दोन लाखांहून अधिक सदस्य नोंदणीकृत असून, प्रत्येक सदस्याकडून 1,800 रुपये शुल्क आकारण्यात आले आहे. विशेष म्हणजे, हे शुल्क देवस्थानच्या अधिकृत तिजोरीत जमा न होता कर्मचाऱ्यांच्या खासगी खात्यांमध्ये जमा झाले आहे. यामुळे देवस्थानला कोट्यवधी रुपयांचा आर्थिक फटका बसला असून, हा भ्रष्टाचाराचा गंभीर प्रकार असल्याचे माळवदे यांनी निवेदनात नमूद केले आहे.

काँग्रेस पदाधिकारी यांची मागणी काय?

देवस्थान प्रशासनाला याबाबत विचारणा केली असता प्रशासन बोलायला तयार नाही. याबाबत प्रशासनाला खुलासा देखील मागितला आहे.परंतु याबाबत देवस्थान प्रशासन बोटचेपी भूमिका घेत आहे. त्यामुळे काँग्रेस पक्ष व शनिभक्ताकडून शनिशिंगणापूर येथे 9 जून रोजी पासून बेमुदत धरणे व उपोषण आंदोलन करण्यात येणार आहे.‌ आपणास या भ्रष्टाचाराबाबत आम्ही लेखी तक्रार देत आहोत.संबंधित घोटाळ्याच्या चौकशीचे आपण तातडीने आदेश देऊन दोषीवर तातडीने करावाई करण्यात यावी व तातडीने गुन्हे दाखल करण्यात यावे अशी मागणी माळवदे यांनी केली आहे.
 
इतर बातम्या
Join Whatsapp Group