गेल्या ४-५ दिवसांतच सोशल मोडियावर कॉकरोच जनता पार्टीने धुमाकूळ घातला अवघ्या ४-५ दिवसांत कॉकरोच जनता पार्टीचे इंस्टाग्रामवर १५ मिलियन चा पुढे फॉलोर्स गेले आहेत. दरम्यान, काळ त्यांचे ट्विटर अकॉउंट सस्पेंड करण्यात आले होते. आता याचबाबत आणखी एक मोठी अपडेट समोर आली आहे.
कॉकरोच जनता पार्टीचे संस्थापक अभिजीत यांना अज्ञात व्यक्तीकडून जीवे मारण्याची धमकी आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या प्रकारामुळे राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली असून सोशल मीडियावरही याची जोरदार चर्चा सुरू झाली आहे. पक्षाचा वाढता प्रभाव आणि काही राजकीय मतभेद यामागे कारण असू शकतात, असा संशय व्यक्त केला जात आहे.
अभिजीत यांनी स्वतः त्यांच्या ‘X’ अकाउंटवर पोस्ट करत या धमकीबाबत माहिती दिली. त्यांनी पोस्टमध्ये धमकीचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलिसांनी तातडीने कारवाई करावी, अशी मागणी केली आहे. या घटनेनंतर त्यांच्या समर्थकांमध्ये संतापाची लाट पसरली असून दोषींना त्वरित अटक करण्याची मागणी होत आहे.दरम्यान, पोलिसांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेत तपास सुरू केला आहे.