दुर्दैवी ! वीज पडून 19 वर्षीय तरुणाचा मृत्यू
दुर्दैवी ! वीज पडून 19 वर्षीय तरुणाचा मृत्यू
img
Dipali Ghadwaje
पुणे : पुणे आणि पिंपरी-चिंचवडमध्ये मागील दोन दिवस मान्सूनपूर्व पावसाने हजेरी लावली. याच दरम्यान वीज पडून 19वर्षीय तरुणाचा मृत्यू  झालाय. चऱ्होली मध्ये काल सायंकाळी कामावरून घरी परत जात होता. याच दरम्यान ही घटना घडली आहे. 

याबाबत मिळालेल्या माहितीनुसार , ओंकार ठाकर असं मरण पावलेल्या तरुणाच नाव आहे. तर तीन दिवसांपूर्वी शेतात भुईमुग काढायला गेलेल्या एका महिलेचा वीज पडून मृत्यू झाला. पुणे जिल्ह्यातील राजगुरुनगरमध्ये ही घटना घडली. तिन्हेवाडी - कोहिनकर वाडी गावांच्या हद्दीवर असलेल्या शेंडेवस्ती येथील शेतात मंगळवारी 4 जूनला ही घटना घडली. परिसरात दुपारी वादळी वाऱ्यासह पाऊस पडला. या दरम्यान मंगल आरुडे व त्यांच्या दोन जाऊबाई शेतात भुईमुग काढायला आल्या होत्या. त्या घरी जायला निघाल्या. काही अंतरावर पुढे गेल्यानंतर त्यांच्यावर वीज कोसळली यात त्यांचा जागीच मृत्यू झाला. मंगल आरूडे यांच्या दुर्दैवी मृत्युने परिसरात हळहळ व्यक्त केली गेली. 
 
दरम्यान पावसादरम्यान होणाऱ्या दुर्घटनांची शक्यता लक्षात घेवून नागरिकांनी खबरदारी घ्यावी असं आवाहन प्रशासनाने केलंय. पावसामध्ये होर्डिंग दुर्घटना, वीज पडणे किंवा अपघात या घटना घडत अनेकांना प्राण गमवावे लागत आहेत, त्या घडू नयेत यासाठी काळजी घेण्याची गरज आहे.
इतर बातम्या
Join Whatsapp Group