पिंपरी चिंचवडमध्ये 'हिट अँड रन'चा थरार..! भरधाव वेगात असलेल्या कारने पादचारी महिलेला उडवलं
पिंपरी चिंचवडमध्ये 'हिट अँड रन'चा थरार..! भरधाव वेगात असलेल्या कारने पादचारी महिलेला उडवलं
img
DB
पिंपरी : गेल्या काही दिवसांपासून पिंपरी-चिंचवड, पुणे शहरात हिट अँड रनच्या घटना अनेकदा घडल्याचं दिसून आलं आहे. पिंपरी- चिंचवडमध्ये ‘हिट अँड रन’प्रकरणे थांबायचं नाव घेत नाहीत. अशातच पुन्हा एकदा पिंपरी गावात कारने पादचारी महिलेला धडक देऊन पसार झाल्याचं सीसीटीव्ही फुटेज समोर आलं आहे.   

मिळालेल्या माहितीनुसार , पिंपरी चिंचवडमध्ये हिट ऍण्ड रनचा प्रकार सीसीटीव्हीत कैद झालाय. सुदैवाने यात एक महिला थोडक्यात बचावल्या आहेत, मात्र त्या जखमी झाल्यात. पिंपरी गावात हा प्रकार रविवारी दुपारी दीडच्या सुमारास घडला आहे. रस्त्याच्या बाजूने चाललेल्या महिलेला कारने समोरून येत ठोकरले. त्यानंतर कार चालक पसार झाला. प्रत्यक्षदर्शींनी त्याचा पाठलाग करण्याचा प्रयत्न केला मात्र तो हाती लागला नाही. आता पिंपरी पोलीस त्या चालकाचा शोध घेत आहे. या घटनेनंतर नागरिकांमधून संताप व्यक्त केला जात आहे.

पिंपरी- चिंचवड मधील पिंपरी गावात अज्ञात भरधाव कारने पादचारी महिलेला धडक देऊन चालक फरार झाला आहे. याप्रकरणी पिंपरी पोलीस ठाण्यात अज्ञात वाहन चालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.  याप्रकरणी पिंपरी पोलीस वाहन चालकाचा शोध घेत आहेत.  
इतर बातम्या
Join Whatsapp Group