खळबळजनक  : पाण्याच्या टँकरमध्ये आढळला महिलेचा मृतदेह, कुठे घडली घटना?
खळबळजनक : पाण्याच्या टँकरमध्ये आढळला महिलेचा मृतदेह, कुठे घडली घटना?
img
Dipali Ghadwaje
पुणे : पुण्यातून धक्कादायक बातमी समोर येत आहे. पाण्याच्या टँकरमध्ये महिलाचा मृतदेह आढळल्यामुळे खळबळ उडाली आहे. पुण्याच्या फुरसुंगीमध्ये ही घटना घडली आहे. टँकरमधून पाणी सोडत असताना हा प्रकार उघड झाला आहे. या घटनेची माहिती मिळताच कोंढवा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत तपास सुरू केला आहे.

याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, पुण्यातील फुरसुंगीमध्ये पाण्याच्या टँकरमध्ये महिलेचा मृतदेह आढळला. फुरसुंगी येथील पॉवर हाऊसजवळ पाणी सोडत असताना हा धक्कादायक प्रकार उघड झाला आहे. पाण्याच्या टँकरमध्ये महिलेचा मृतदेह आढळल्यामुळे खळबळ उडाली आहे. कौशल्या मुकेश चव्हाण असं या मृत महिलेचे नाव आहे. या महिलेची हत्या झाली की तिने आत्महत्या केली यामागचे कारण अद्याप समजू शकले नाही. 

दरम्यान स्थानिकांनी घटनेची माहिती पोलिसांना दिली असता कोंढवा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. या प्रकरणाचा तपास पोलिसांकडून सुरू आहे.

कौशल्या चव्हाण या हरवल्याची तक्रार कोंढवा पोलिस ठाण्यात दाखल करण्यात आली होती. पोलिस या महिलेचा शोध घेत होते. अशामध्ये या महिलेचा मृतदेह सापडल्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. याप्रकरणाचा पोलिसांकडून तपास सुरू आहे.  
इतर बातम्या
Join Whatsapp Group