दिमाखात पाण्यात स्टंट करायला गेला अन् ; तरुण गेला वाहून
दिमाखात पाण्यात स्टंट करायला गेला अन् ; तरुण गेला वाहून
img
Dipali Ghadwaje
लोणावळ्यातील भुशी डॅम येथे एकाच कुटुंबातील ५ जण वाहून गेल्याची घटना ताजी असतानाच आता ताम्हिणी घाटातही अशाच प्रकारची घटना घडली आहे. सहलीसाठी आलेला एक तरुण ताम्हिणी घाटातील धबधब्यात बुडाला आहे. 

याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, स्वप्नील धावडे असं या तरुणाचं नाव आहे. सध्या बचाव पथकाचे जवान त्याचा शोध घेत आहेत. या थरारक घटनेचा व्हिडीओ समोर आला आहे. 

दरम्यान स्वप्नील हा आपल्या जिममधील 32 जणांच्या ग्रुपसोबत ताम्हिणी घाटात फिरण्यासाठी गेला होता. धबधब्यातील पाणी पाहून त्याला पोहण्याचा मोह आवरला नाही. त्याने स्टंट करण्याच्या नादात पाण्यात उडी घेतली. पण खोल पाण्यात पडल्यानंतर तो बुडू लागला. त्याच्या सोबत असलेल्या इतर मित्रांनी आरडाओरड सुरू केली. मात्र, स्वप्नील हा पाण्याच्या प्रवाहात वाहून गेला. या भयानक घटनेचा व्हिडीओ समोर आला आहे.
इतर बातम्या
Join Whatsapp Group