जायकवाडी धरणाचे तब्बल ६ दरवाजे उघडले ; गोदावरी नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा
जायकवाडी धरणाचे तब्बल ६ दरवाजे उघडले ; गोदावरी नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा
img
Dipali Ghadwaje
आताची एक मोठी बातमी समोर आली आहे. छत्रपती संभाजीनगरसह संपूर्ण मराठवाड्याला पाणीपुरवठा करणारे जायकवाडी धरण तब्बल 97.30 टक्के भरलं आहे. त्यामुळे आज सोमवारी दुपारी 1 वाजेच्या सुमारास धरणाचे 6 दरवाजे उघडण्यात आले आहेत. 0.5 फुटाने धरणाचे दरवाजे उघडण्यात आल्याने गोदावरी नदीला पूर आलाय. 

त्यामुळे नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय. सध्या जायकवाडी धरणातून गोदापात्रात 3144 क्युसेस इतक्या वेगाने पाण्याचा विसर्ग सुरू आहे. गरज भासल्यास पाण्याचा विसर्ग आणखी वाढवण्यात येईल, अशी माहिती पाठबंधारे विभागाने दिली आहे. 
इतर बातम्या
Join Whatsapp Group