शासकीय रुग्णालयात मृत्यू तांडव सुरूच; नांदेड नंतर आता आता
शासकीय रुग्णालयात मृत्यू तांडव सुरूच; नांदेड नंतर आता आता "या" जिल्ह्यात 10 जणांचा मृत्यू
img
दैनिक भ्रमर
नांदेड नंतर आणखी एक घटना समोर आली आहे. काल नांदेडच्या शासकीय रुग्णालयात 24 तासात तब्बल 24 रुग्णांचा मृत्यू झाला. नंतर आज आणखी 7 जणांचा मृत्यू झाल्याने ही संख्या 31 वर पोहोचली आहे. 

आता छत्रपती संभाजीनगरच्या घाटी रुग्णालयातही अशीच घटना घडली आहे. त्यामुळे शासकीय रुग्णालयाच्या कारभाराबाबत अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत. घाटी रुग्णालय हे छत्रपती संभाजीनगरमधील एक मोठ आणि महत्त्वाच रुग्णालय आहे. दररोज हजारो रुग्ण इथे उपचारासाठी येत असतात.

घाटी रुग्णालयात मागच्या 24 तासात 10 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. यामध्ये 2 बालकांचा समावेश आहे. घाटी रुग्णालायत ज्या रुग्णांचा मृत्यू झालाय, त्यांना बाहेरच्या रुग्णालयातून रेफर करण्यात आले होते असे समजते. दरम्यान घाटी रुग्णालयात 15 दिवस पुरेल इतकाच औषधांचा साठा असल्याची माहिती आहे. काही महिन्यांपूर्वी कळव्याच्या एका रुग्णालयात एकाच रात्री तब्बल 17 रुग्णांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली होती. 

हाफकीनने औषधी खरेदी बंद केल्यामुळे राज्यभरातील शासकीय रुग्णालयात औषधांचा प्रचंड तुटवडा जाणवत आहे. त्यामुळे अत्यवस्थ रुग्णांना वेळेत औषधे पुरवठा होत नसल्याने जीव गमवावा लागत आहे. असाच धक्कादायक प्रकार नांदेडमधल्या शासकीय रुग्णालयात पुढे आला आहे.

राज्य सरकारने वेळीच याची दखल घेऊन आवश्यक पावल उचलली पाहिजेत. अन्यथा आरोग्य सुविधेअभावी निष्पाप नागरिकांना आपले प्राण गमवावे लागतील असा सूर जनतेतून व्यक्त होत आहे.
इतर बातम्या
Join Whatsapp Group