संभाजीनगरमध्ये तुफान राडा! भाजप आणि ठाकरे गटाचे कार्यकर्ते भिडले
संभाजीनगरमध्ये तुफान राडा! भाजप आणि ठाकरे गटाचे कार्यकर्ते भिडले
img
DB
छत्रपती संभाजीनगर : छत्रपती संभाजीनगरमध्ये आदित्य ठाकरे यांच्या दौऱ्यादरम्यान भाजप आणि ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांमध्ये मोठा संघर्ष उफाळला. दोन्ही पक्षांचे कार्यकर्ते एकमेकांवर धावून गेले आणि जोरदार घोषणाबाजी केली.

या घडामोडींमुडीं मुळे परिस्थिती इतकी गंभीर झाली की, पोलिसांना जमावावर नियंत्रण मिळवण्यासाठी लाठीचार्ज करावा लागला. या लाठीचार्जमध्ये काही कार्यकर्ते जखमी झाले असून, पोलिसांनी काही जणांना ताब्यात घेतले आहे. या घटनेमुळे संभाजीनगरमध्ये तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे.  

आदित्य ठाकरे छत्रपती संभाजीनगरमध्ये आले असता, त्यांच्या दौऱ्याला भाजप कार्यकर्त्यांनी जोरदार विरोध केला. भाजप कार्यकर्त्यांनी "मोदी, मोदी"च्या घोषणा देत ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांना आव्हान दिले. या विरोधाला प्रत्युत्तर देताना ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी देखील "उद्धव ठाकरे जिंदाबाद"च्या घोषणा दिल्या.  घोषणाबाजीमुळे वातावरण अधिकच तापले आणि दोन्ही पक्षांचे कार्यकर्ते एकमेकांवर धावून गेले.
 
इतर बातम्या
Join Whatsapp Group